मुंबई : T-20 विश्वचषक 2021 च्या सर्वात मोठ्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना टीम इंडियाशी होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर असतात, तेव्हा प्रेक्षकांचा उत्साहही शिगेला पोहोचतो. आपल्याला आठवतं का, जेव्हा आपण शेवटच्या वेळी विश्वचषकात पाकिस्तानला भेटलो होतो, तेव्हा शेजारच्या संघाचा कर्णधार सरफराज मैदानावर जांभई देत होता. तपासाअंती असे आढळून आले की, पाकिस्तानचा संघ सामन्याच्या आदल्या रात्री बर्गर आणि पिझ्झा खाऊन आले होते. यासाठी झोमॅटोने पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली आहे.
Dear @TheRealPCB, in case you’re looking for ?????? or ????? tonight, we’re just a DM away ?
— zomato (@zomato) October 23, 2021
सामन्याच्या आदल्या रात्री झोमॅटोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पाकिस्तानला टॅग केले आणि लिहिले, ‘तुम्हाला पिझ्झा आणि बर्गर हवा असल्यास तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता.’
Bs muje itna confidence chahiye life me??? pic.twitter.com/Wne3w3guyw
— ? ??? ?????????? ??™??? (@HitKandoriya) October 23, 2021
Meanwhile @TheRealPCB : pic.twitter.com/lnXnbzxKMV
— Vivek Gautam (@Imvivek04) October 23, 2021
Burger khate rahe pizza khate rahe ??? pic.twitter.com/1OABYgFVND
— ENGG.ABDUL KHADAR ???? (@abdulkhadarhj) October 23, 2021
झोमॅटोचे हे ट्विट सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. ज्यावर भारतीय चाहतेही पाकिस्तानची फीरकी घेऊ लागले आहेत. या ट्विटवर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवून आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
Nailed it @mominsaqib and @Bilalbinsaqib .@azharjavaiduk very good interview. pic.twitter.com/VCVlUMdFpB
— Ibrahim Tariq Shafi (@IbrahimTShafi) June 16, 2019
Meanwhile @TheRealPCB be like : इधर जहर खाने को पैसा नहीं है रे बाबा
— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) October 23, 2021
भारतीय चाहत्यांनी पाकिस्तान्यांना टोमणे मारण्याची ही शैली लोकांना खूप आवडत आहे. अनेक वापरकर्त्यांनी मजेदार कमेंट्स आणि मीम्स शेअर केले आहेत. मीम शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘जर त्यांच्याकडे विष खायला पैसे नाहीत, तर ते चांगले बर्गर आणि पिझ्झा कुठून खातील.
T-20 विश्वचषक दुबईमध्ये सुरु झाला आहे. भारत 24 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी आहे. हा सामना संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
संबंधित बातम्या :
Video: भारत-पाकिस्तान मॅचआधी मौका-मौकाची जाहिरात, भारतीय नेटकऱ्यांकडून व्हिडीओ व्हायरल