T20 World Cup पाकिस्तानच्या बॅटिंगवर नेटकऱ्यांचे Sixer! World Cup Final मध्ये memes जिंकले म्हणायचं

| Updated on: Nov 13, 2022 | 4:28 PM

बाबर आझमने 32 धावा केल्या असल्या तरी त्याच्याकडून अपेक्षा खूप जास्त होत्या.

T20 World Cup पाकिस्तानच्या बॅटिंगवर नेटकऱ्यांचे Sixer! World Cup Final मध्ये memes जिंकले म्हणायचं
memes on pakistan batting
Image Credit source: Social Media
Follow us on

आज टी-20 वर्ल्ड कप 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाला 20 षटकात 8 गडी गमावत केवळ 137 धावा करता आल्या. संघाचा एकही खेळाडू व्यवस्थित फलंदाजी करू शकला नाही. संघाचा तगडा खेळाडू मानला जाणारा मोहम्मद रिझवान लवकरच बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबर आझमने 32 धावा केल्या असल्या तरी त्याच्याकडून अपेक्षा खूप जास्त होत्या. याशिवाय शान मसूदनेही 38 धावांचा डाव खेळला, पण त्यानंतर तोही पुढे गेला. पाकिस्तानी संघाची फलंदाजी पाहून लोकांना अजिबात आनंद झाला नाही. आपल्याला तर काय संधी पाहिजे मिम्स बनवायची. लोक सोशल मीडियावर पाकिस्तन टीमची खिल्ली उडवत आहेत.

पाकिस्तानची बॅटिंग पाहून सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला आहे. कुणी इफ्तिखार अहमदच्या खराब फलंदाजीची खिल्ली उडवत आहे, तर कुणी मिम्सच्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अवस्था सांगत आहे.

पाकिस्तानच्या फलंदाजीवर मिम्स