इंटरनेटवर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ असतात. रोज एक व्हिडिओ व्हायरल होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉट्सॲपपर्यंत पोहचतो. तो पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यक्ती किचनमध्ये स्वयंपाक करत आहे. हा व्हिडीओ पूर्ण बघा, स्वयंपाकापेक्षाही अजून काहीतरी वाढीव आहे.
किचनमध्ये स्वयंपाक करणं हे काही सोपं काम नाही की एक दिवस वाटलं आणि आपण शेफप्रमाणे स्वयंपाक करायला लागलो. त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे. जे आजकाल कोणालाच करायचे नसतात.
मग नेमकी एक दिवस काम करणारे टीव्हीवरच्या शेफसारखं करायला जातात आणि फसतात. असंच केलं बॅचलर मुलांनी. हॉस्टेल वर, पीजी वर बॅचलर मुलं असे अनेक स्टंट मारतात. एकाने असंच केलं, तडका मारायला गेला, आणि तडका मारता मारता जाळच निघाला.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस गॅस स्टोव्हवर पळी मध्ये तेल गरम करत आहे. त्याच्याकडे पाहून असं वाटतं की, तो तडका लावतोय. जसा तो तडक मारतो आणि ती गरम गरम पळी पातेल्यात टाकतो तेव्हा एकदम आग निघते.
पळी इतकी गरम झाल्याचा अंदाज या मुलाला येतंच नाही. मग नंतर ते या पराक्रमावर हसतात. हा व्हिडिओ कुठून आला आहे याबाबत आमच्याकडे माहिती नाही.
हा व्हिडिओ flurtingboy नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला 90 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.