लोकांनी या माणसाला ‘बॅलन्सवीर’ अशी पदवी दिली, व्हिडीओ बघा

| Updated on: Dec 18, 2022 | 6:36 PM

त्याने एक मजेदार कॅप्शन लिहिले - "माझा 32 जीबी फोन 31.9 जीबी डेटा हाताळताना."

लोकांनी या माणसाला बॅलन्सवीर अशी पदवी दिली, व्हिडीओ बघा
heavy driver
Image Credit source: Social Media
Follow us on

रस्त्यावर एकापेक्षा एक ‘हेवी ड्रायव्हर’ असतात. हा व्हिडिओ एका ‘खतरों के खिलाडी’चा आहे, ज्याच्या या पराक्रमाला सोशल मीडियावर बघून जनता आश्चर्यचकित झाली आहे. खरं तर हा माणूस स्कूटी चालवतोय, पण स्कुटीवर एवढं सामान आहे की त्याला पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटर युजरने 21 जून रोजी @sagarcasm शेअर केला होता. त्याने एक मजेदार कॅप्शन लिहिले – “माझा 32 जीबी फोन 31.9 जीबी डेटा हाताळताना.” ही क्लिप व्हायरल झाली.

तेलंगणा पोलिसांनी हा व्हिडिओ रिट्विट करून लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली आणि लिहिले- “मोबाईलचा डेटा उडाला तर तो पुन्हा घेता येतो, पण आयुष्याचे तसे नाही…त्यामुळे लोकांनी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन आम्ही करतो.”

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठ्या स्वॅगने रस्त्यावर स्कूटी चालवताना दिसत आहे. त्याचा पराक्रम असा आहे की, ‘हेवी ड्रायव्हर’लाही लाज वाटेल.

तो चालवत असलेल्या स्कुटीवर इतकं सामान ठेवलंय की त्यावर आणखी काहीच ठेवायला जागा नाही. होय, स्कूटी सामानाने भरलेली आहे आणि तो माणूस एका छोट्या जागेत बसून दुचाकी चालवत आहे.

त्या माणसाचे हे कौशल्य पाहून लोक अवाक होतात. काहींनी तर ‘बॅलन्सवीर’ ही पदवीही त्या माणसाला दिली आहे जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा लोक प्रतिक्रिया देण्यापासून स्वत: ला रोखू शकले नाहीत.