सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात महागड्या आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे सिनेमे रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण करतात. त्यानी तेरे नाम, वॉन्टेड, एक था टायगर आणि सुलतान सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तेरे नाम हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. 2003 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला होता. त्यात सलमान खानने ठेवलेली हेअरस्टाईल देशभरात प्रसिद्ध झाली. सध्या सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने सलमानचा हाच लूक करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र लोकांनी त्याला ट्रोल केलंय.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने कसा डुप्लिकेट सलमान खान बनण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तेरे नाम’ मधली त्याची ही हेअरस्टाईल असून त्याने ब्लॅक कलरचा चष्माही घातला आहे, जेणेकरून तो अगदी सलखान खानसारखा दिसेल.
तो ही काहीसा सलमान खानसारखा दिसतो. त्याची एक झलक पाहिली तरी कुणीही त्याला ‘तेरे नाम’चा खरा सलमान खान म्हणेल. मात्र समोरून तो दिसला तर कळेल की तो डुप्लिकेट सलमान खान आहे. तसं तर त्या व्यक्तीने सलमान खानचा नेमका लूक स्वत:नुसार आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सलमान खानचा हा डुप्लिकेट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सरिताराज 3251 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 23 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर 2 लाख 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे आणि विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने त्याला ट्रोल करत लिहिलं आहे की, ‘हा चोर मार्केटचा सलमान खान’, तर दुसऱ्या युजरने एक्सपायरी डेटनंतर हा सलमान खान असल्याचं लिहिलं आहे. त्याचप्रमाणे एका युजरने त्याला मजेशीर पद्धतीने ‘सावलोन भाई’ हे नाव दिले आहे.