मुंबई : सोशल मीडियावर (Social media) एकापेक्षा एक गाणी ऐकायला मिळतात. लोक आपल्या सुरेल आवाजाने सर्वांची मनं जिंकताना दिसतात. जवळपास सर्वांनाच गाणे ऐकायला आवडते. सध्या सोशल मीडियावर एक गाण्याचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहून प्रत्येकाला खूप अभिमान वाटतो आहे.
अमेरिकेमध्ये गायले तेरी मिट्टी गाणे
नुकतेच एका मुलीने ‘तेरी मिट्टी’ मधील गाणे गाऊन अमेरिकेत भारताचा झेंडा फडकावला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती मुलगी मधुर आवाजात गाणे म्हणताना दिसत आहे. गाणे म्हणण्यासोबतच तिच्या हातामध्ये भारताचा तिरंगा देखील आहे. गाणे ऐकल्यानंतर तुमच्यातही देशभक्तीची भावना जागृत होईल. या व्हिडिओला सोशल मीडियावर यूजर्स खूप पसंती देत आहेत.
लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रेमाचा वर्षाव या व्हिडीओवर होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही Geeta Ben Rabari च्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडीओ 1 लाख 20 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या गाण्यावर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मनोज मुंतशिर यांनी दिली कमेंट
मनोज मुंतशिर यांनी देखील या व्हिडीओ कमेंट दिली आहे. त्यांनी लिहिले की, गीता बेन रबारी जी तुमचा आवाज क्षितिजापर्यंत पोहोचतो आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजर्सने लिहिले की, व्वा…तुझा आवाज खूप गोड आहे. याशिवाय दुसऱ्याने लिहिले की, व्हिडिओ हा अप्रतिम आहे आणि तुझा आवाज खूप मधुर आहे, तू देशाची शान आहेस.
संबंधित बातम्या :
Video : महिलेची पर्स चोरून पळत होता, एक पठ्ठ्यानं पकडून कसा तुडवला बघा…
Video : पहिल्यांदा कोल्ड्रिंग पिणाऱ्या चिमुकलीचे भन्नाट रिअॅक्शन पाहा, व्हिडिओ व्हायरल