मुंबईत लोकलमध्ये (Mumbai Local), पुण्यात रिक्षामध्ये (Pune Rickshaw), मोठ-मोठ्या शहरांत टॅक्सीमध्ये किंवा कार-बसमध्ये बायकांची प्रसुती (Delivery) झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. वाचल्या असतील. कदाचित डोळ्यांनी पाहिल्याही असलीत. पण कल्पना करा, स्वतः कार मधून जाताना वाटेतच एका गरोदर (Pregnant) महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या. इतकंच काय तर, गाडीतून जात असताना फ्रंटसीटवर बसूनच… त्या गरोदर महिलेनं चालत्या गाडीतच एका गोंडस बाळाला जन्मही दिला…! असं कधी याआधी तुम्ही वाचलंय का? पाहिलंय का? नाही ना? पण खरंच असं घडलंय मंडळी!
अमेरिकेत एका महिलेनं कारच्या फ्रंट सीटवर बसूनच एका बाळाला जन्म दिला. कारमध्ये बसताना ही महिला एकटीच होती. पण कारमधून उतरेपर्यंत या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. कारमध्ये बसल्यापासून ते कारमध्ये उतरण्यापर्यंतचा हा प्रवास ती गरोदर महिला कधीच विसरु शकणार नाही!
त्या आईचं नाव आ,हे यीरन शेरी (Yiran Wu Sherry). वय आहे ३३ वर्ष. यीरन आणि तिचा पती आल्या तीन वर्षांच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी कारनं (Tesla electric vehicle) निघाले होते. वाटेतच यीरन शेरी प्रसुती कळांनी विव्हळू लागल्या होत्या. रस्त्यावर इतकं ट्रॅफिक होतं, की हॉस्पिटल गाठणं निव्वळ अशक्य असल्याचं यीरन यांचे पती केएटिंग शेरी यांच्या लक्षात आलं.
ट्रॅफिक इतकं जॅम होतं, की गाड्या जागेवरुन हलतही नव्हत्या. आता करायचं काय?, यीरन यांच्या पतीला काहीच सुचेनासं झालं होतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचणार तरी कसं, या प्रश्नानं केएटिंग शेरी अस्वस्थ झाले होते. पण प्रसंगावधान राखत त्यांनी आपल्या टेस्ला कारला ऑटोपायलटवर (Tesla On Autopilot) टाकलं आणि हॉस्पिटलचं(Hospital) लोकेशन सेट केलं. यानंतर केएटिंग शेरी आपल्या पत्नीला मदत करु लागले. तिला धीर देऊ लागले. केरी जिवाच्या आकांतानं यावेळी विव्हळत होती. तेव्हा तिला हिम्मत देत केएटिंग यांनी यीरन यांचा हात आपल्या हातात घेतला आणि श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं.
ट्रॅफिकमधून हॉस्पिटलपर्यंत जायला 20 मिनिटं लागणार असल्याचं जीपीएसवरुन दिसत होतं. सुदैवानं ट्रॅफिक निवळलं आणि कार हॉस्पिटलमध्ये पोहोचणार, त्याच्या अगदी काही क्षण अगोदरच केरी यांची प्रसुती झाली. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. प्रसुतीआधीचा हा सगळा प्रसंग यीरन यांनी कारच्या फ्रंटसीटवर (Front Seat) बसूनच अनुभवला होता.
त्यानंतर जेव्हा यीरन यांना रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा त्यांच्या बाळाला नर्स आणि डॉक्टर टेस्ला बेबी म्हणूनच संबोधू लागले होते. टेस्ला इलेक्ट्रीक कारच्या ऑटोपायलट मोडमुळे केएटिंग यांनी यीरन हॉस्पिटलपर्यंत सुखरुप पोहोचू शकले होते. त्यामुळे एका क्षणी तर या केएटिंग यांनी यीरन या उभयतांनीही आपलं नवजात बाळ हे बेबी टेस असल्याचं म्हटलं होतं. आता या टेस्ला बेबीचं नामकरण करण्यात आलं असून त्याचं नाव ठेवण्यात आलंय मीव्ह! यीरन यांनी मीव्ह बद्दल एक खास फेसबुक पोस्टही लिहिली आहे.
पण ट्राफिस जॅमपासून ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास यीरन आणि केएटिंग यांच्यासाठी किती आव्हानात्मक होता, याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी! नुकतेच यीरन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पहिल्या टेस्ला बेबीचे फोटो शेअर केलेत. ज्यात त्यांचं गोंडस बाळ तितक्या गोंडस प्रतिक्रिया देताना कॅमेऱ्यात कैद झालंय.
Pregnancy Problems | प्रसुतीनंतर ताप येतोय, घाबरण्यांचं कारण नाही! जाणून घ्या काय आहेत कारणं…
तुम्हाला या सवयी आहेत…त्याचा होऊ शकतो मुलांवर परिणाम…तर सोडा या सवयी
काय गं सारखी युरिनला जातेय…काही त्रास होतोय का?…मैत्रिणे हे युरिन इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं