मुंबई : लग्नाचा सिझन सुरू असल्याने लग्नातले विविध व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यातले काही रोमॅन्टिक आहेत तर काही फनी. फनी व्हीडिओंना जास्त पसंती मिळताना दिसतेय. असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय. व्हीडिओमध्ये लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वधू आणि वर नातेवाईकांसोबत जेवायला बसलेले दिसत आहेत. वधू-वर (bride and groom) शेजारी शेजारी बसलेले असताना नवरी अचानक अशी कृती करते की त्यामुळे उपस्थितांना आश्चर्य वाटतं. वधू चक्क धुर नवरदेवाच्या तोंडावर सोडते.
एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हीडिओमध्ये लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वधू आणि वर नातेवाईकांसोबत जेवायला बसलेले दिसत आहेत. वधू-वर शेजारी शेजारी बसलेले असताना नवरी अचानक अशी कृती करते की त्यामुळे उपस्थितांना आश्चर्य वाटतं. वधू चक्क धुर नवरदेवाच्या तोंडावर सोडते.
हा व्हीडीओ अनेकांनी संताप व्यक्त केलाय. व्हीडिओमध्ये वधू लग्नाच्या दिवशी तोंडातून धुराची सोडताना दिसत आहे. हे पाहून नातेवाईक आश्चर्यचकित झालेत.त्यावरची वराची रिअॅक्शन जरा वेगळी आहे. तो तिच्याकडे पाहून आधी हसतो आणि मग तिला हळूच धक्का देतो.
हा व्हीडिओ official_viralclips या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. तर तीन हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.
व्हीडिओमध्ये नववधूची कृती पाहून उपस्थितांसह नेटकऱ्यांनाही धक्का बसलाय. स्वत: च्या लग्नात अशी कृती कओ करतं असं नेटकरी म्हणत आहेत. एकाने म्हटलंय की लग्नाच्या मंडपात गांजा ओढणारी नवरी पहिलांदाच पाहिली. दुसरा म्हणतो, नवरीच्या धाडसाचं कौतुक, कारण लग्न मंडपात अशी कृती करायला धाडस लागतं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.