माणूस एकदा जर ट्राफिक मध्ये फसला तर कोण सीईओ आणि कोण कशाचा मालक सगळ्यांना फक्त वेळेत पोहोचणं एवढं एकच ध्येय असतं. मग वेळेत पोहचण्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. आता ही व्हायरल पोस्टच बघा ना… मर्सिडीज-बेंझ इंडियाचा सीईओ रिक्षात बसलाय. किती अजब आहेना? स्वतः मर्सिडीज-बेंझ इंडिया चा सीईओ, ते पण रिक्षामध्ये!
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे सीईओ मार्टिन श्विंक यांनी इन्स्टाग्रामवर ऑटो-रिक्षामध्ये बसलेला एक फोटो शेअर केलाय. या पोस्टने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलंय.
श्विंकने रिक्षात बसण्याचं कारण सुद्धा सांगितलंय जे बऱ्याच लोकांना पटलेलं आहे. “जर तुमची एस-क्लास पुण्याच्या अप्रतिम रस्त्यांवर ट्रॅफिकमध्ये अडकली असेल तर – तुम्ही काय करता? कदाचित गाडीतून उतरून, काही किलोमीटर चालून, रिक्षा पकडता?”
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुण्यातील आपल्या मर्सिडीज एस-क्लासमधून एके ठिकाणी जात होते. पण, ते ट्रॅफिकमध्ये अडकले.
तेव्हाच ते आपल्या हायएंड गाडीतून उतरले आणि त्यांनी रिक्षा घेण्यासाठी काही किलोमीटर चालत जाण्याचा निर्णय घेतला.
होय, तुम्ही ते बरोबर वाचलंय! एका बड्या ऑटोमोबाईल कंपनीच्या सीईओसाठी एक साधारण रिक्षा तारणहार ठरली.