बंगळुरु | 28 सप्टेंबर 2023 : कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील ट्रॅफीक जामच्या समस्येने कहर केला आहे. दिवसेदिवस ही समस्या वाढतच आहे. काही किमी अंतरावर पोहचण्यासाठी लोकांना तासन् तास लागत आहेत. बंगळुरुच्या आऊटर रिंग रोडवर तर कारचे झालेले जीवघेणे ट्रॅफीक इतके वाईट होते की ही ट्रॅफीक कोंडी दूर होण्यासाठी पाच ते सहा तास लागले. त्यामुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परतण्यासाठी रात्रीचे आठ वाजल्याचे म्हटले जात आहे. अशातच एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
सोशल मिडीया साईट ‘एक्स’वर ( पूर्वीचे ट्वीटर ) एका युवकाचा बंगळुरुच्या ट्रॅफीक संबंधीचा व्हिडीओ पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. या तरुणाने ट्रॅफीक जाममध्ये अडकलेला असताना पिझ्झाची ऑर्डर केली आणि इतके ट्रॅफीक जाम असून पिझ्झा डिलिव्हरी करताना तेथे पोहचला देखील ! इतक्या मुंगीच्या गतीने चालणाऱ्या कारमधून वाट काढत अजिबात लेट न होणाऱ्या या पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे कौतूक होत आहे. एक्स युजर ऋषिवत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की जेव्हा आम्ही ट्रॅफीकमध्ये डोमिनोचा पिझ्झा ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला. पिझ्झा डिलिव्हरी बॉयने त्यांचे लाईव्ह लोकेशन शोधून काढत हा पिझ्झा कारमध्ये डिलिव्हर केला. या ट्रॅफीकमध्ये काही मीटर कार चालविणेच शक्य होते.
येथे पाहा व्हिडीओ –
When we decided to order from @dominos during the Bangalore choke. They were kind enough to track our live location (a few metres away from our random location added in the traffic) and deliver to us in the traffic jam. #Bengaluru #bengalurutraffic #bangaloretraffic pic.twitter.com/stnFDh2cHz
— Rishivaths (@rishivaths) September 27, 2023
एक्सवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत डिलिव्हरी बॉय पिझ्झा बाईकवरुन घेऊन येताना दिसत आहे. त्यानंतर कारमधील तरुणांनी या पिझ्झाची डिलिव्हरी होताना दिसत आहे. काल रात्री केलेल्या या पोस्टला आतापर्यंत पाच लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. अनेक युजरने यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळत आहे. विबिन नावाच्या युजरने लिहिले आहे की पुढच्या वेळी मी अर्बन कंपनीकडे मसाज ऑर्डर बुक करणार आहे. दिबाकर दत्ता या युजरने म्हटले आहे की, ‘संकटात संधी !’ या पोस्टवर आतापर्यंत 281 हून अधिक कमेंट आल्या आहेत. तर 1214 हून अधिक लोकांनी रिपोस्ट केले आहे. तर 9414 लोकांचे लाईक्स मिळाले आहेत.