आयुष्यात काही कामं अशी असतात, ज्यासाठी लोकांची मदत घ्यावी लागते. काही कामं एकमेकांच्या मदतीनेच शक्य होतात. असाच एक व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यात काही मजूर ट्रकवर ( truck) लाकूड ( wooden logs) चढवण्यासाठी काम करत आहेत. आपण पाहिले असेल की मोठ्या कॉर्पोरेट जगतात टीमवर्कलाच ( workers’ teamwork) सर्वाधिक महत्त्व आहे. त्याच प्रकारे, या मजुरांनीही सिद्ध केलं आहे की, एकीचं बळच मोठं असतं. ( The idea of abandoning the laborers to load the wooden logs on the truck. Video of workers’ teamwork goes viral )
बऱ्याचदा मजूर ट्रकवर लाकूड चढवण्यासाठी वेगवेगळे सर्वोत्तम मार्ग शोधत असतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कामगार ट्रकच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. त्यांनी 2 मोठे ओंडके ट्रकच्या आधाराने उभे केले आहेत. त्यानंतर एका मोठ्या झाडाचे लाकूड त्यावर ते दोरीने बांधून ठेवतात. काही कामगार ट्रकच्या वर उभे राहून ते खेचत आहेत, तर काही ट्रकच्या खालून तो ओंडका ढकलत आहेत. कामगारांचे हे टीम वर्क नेटकऱ्यांना भलतंच आवडलेलं दिसतं आहे.
#Team pic.twitter.com/HnJYKNgjSk
— Thejes Sekhar,IFS (@THEJES_IFS18) September 14, 2021
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. व्हिडिओखाली कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहलं आहे की, ‘व्हॉट अॅन आयडिया सर जी’ दुसर्याने लिहिलं आहे की, ‘इतके सुंदर उदाहरण .. टीमवर्कसह काहीही साध्य करता येते’ तिसऱ्याने व्हिडिओवर लिहिलं आहे की, ‘सध्याच्या जगात असं एकीचं बळ क्वचितच पाहायला मिळतं, हा व्हिडिओ खूप मस्त आहे ‘या व्यतिरिक्त, इतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर महान, उत्तम, चांगले प्रयत्न सारखे कमेंट केल्या आहेत, तर काहींनी आश्चर्याचे इमोजीज ट्विट केले आहेत.
हा व्हिडीओ @THEJES_IFS18 नावाच्या नेटकऱ्यानेन शेअर केला आहे. जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडताना दिसतो आहे.
हेही वाचा: