Video: नागाला डिवचणं इसमाला पडलं महागात, नाग लागला पाठी, मग… पाहा व्हिडीओ

| Updated on: Dec 28, 2022 | 1:17 PM

Cobra Attack Video: रस्त्याने जाणाऱ्या नागाशी घेतला पंगा, अन् पळता भुई थोडी झाली, पाहा व्हिडीओ नागाने काय शिक्षा दिली

Video: नागाला डिवचणं इसमाला पडलं महागात, नाग लागला पाठी, मग... पाहा व्हिडीओ
Cobra Attack Video
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Cobra Attack Video) झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आणि साप यांच्यातला संघर्ष पाहायला मिळत आहे. जसे “कर्म तसे फळ” असं लोकं अनेकदा सहज बोलतात. परंतु सध्या व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओतून ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की, इथल्या कर्माचं फळ इथचं तात्काळ मिळतं. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. नागाचा पाहिल्यानंतर अनेकांना घाम फुटतो.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

एका रस्त्यात एक नाग बसला आहे. त्यावेळी त्या रस्त्यातून निघालेल्या इसमाने नागाला पाहून आपली कार थांबवली. त्याचबरोबर सोबत असलेल्या बंदुकीतून अनेकवेळा नागाला गोळी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु नागाने प्रत्येकवेळी गोळी वाचवली आहे. ज्यावेळी नागाला राग येतो, त्यावेळी बंदुक चालवणाऱ्या इसमाच्या तो मागे लागतो. त्यानंतर काय होतं, ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी नागाने त्या व्यक्तीवरती हल्ला केला. त्यावेळी त्या व्यक्तीची तब्येत बिघडली असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे नागाने ज्यावेळी हल्ला केला, त्यावेळी बंदुकधारी व्यक्ती जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज व्हिडीओत येत आहे.

@Instantregretss या ट्विटरच्या युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला अधिक लोकांनी लाईक सुध्दा केले आहे. आतापर्यंत दीड लाख लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर पाच हजार लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे.