वॉश्गिंटन– अमेरिकेतील डॉक्टरांच्या टीमने जानेवारी 2022 मध्ये एका माणसाच्या शरिरात डुक्कराचं हार्ट ट्रान्सप्लान्ट केलं होतं. हे ऑपरेशन यशस्वीही ठरलं. मात्र दोन महिन्यांनंतर मार्चमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीच्या मृत्यूचं योग्य कारण सांगितलं नव्हतं, काही दिवसांपासून डेव्हीड यांची प्रकृती बिघडू लागली होती, असं फक्त डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं होतं. 7 जानेवारी 2022 रोजी युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिसीन यांच्या डॉक्टरांनी हे ऑपरेशन केलं होतं. आता या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, हा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध आता संशोधक घेत होते. डुक्कराचं ह्रद्य माणसाला लावल्याने जर मृत्यू झाला असेल तर, ऑपरेशननंतर डेव्हीड दोन महिने जिवंत राहिले तरी कसे, असाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नेमकं चुकलं काय, असं गूढ निर्माण झालं होतं हे गूढ उकलण्याचा प्रयत्न संशोधक करत होते. अखेरीस या प्रकणात एक अहवाल नुकताच हाती आला आहे. त्यानुसार जे ह्रद् डेव्हीड बेनेट यांना लावण्यात आले होते, त्यात एक जनावरांचा व्हायरस आढळून आल्याचं समोर आलं आहे. हे बेनेट यांच्या मृत्यूचे मुख्य कारण असल्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही याच कारणामुळे मृत्यू झाला, हे दाव्याने सांगता येत नाहीये. ट्रान्सप्लान्ट करण्यात आलेल्या ह्रद्यात हा व्हायरस होता, याला एमआयटी टेक्नॉलॉजीने दुजोरा दिला आहे.
&
A Maryland man who died two months after receiving a heart transplant from a genetically altered pig was infected with a virus that the animals are known to carry, according to the surgeon. The infection may have contributed to his death. https://t.co/uAnhhTemO3
— The New York Times (@nytimes) May 5, 2022
डॉक्टरांनी ५७ वर्षीय डेव्हीड बेनेट यांच्या शरिरात जेनेटिकली बदल केलेले डुकराचे ह्रद्य बसवले होते. आता मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी सांगितले आहे की या डुक्कराच्या ह्रद्यात एक व्हायरस सापडला आहे. ज्याला पोर्सिन साइटोमेगालोवायरस नावाने संबोधले जाते. मात्र जेव्हा प्रत्यक्ष ही शस्त्रक्रिया पार पडली, त्यावेळी या व्हायरसचे कोणतेही संकेत डॉक्टरांना मिळाले नव्हते, असेही सांगण्यात येत आहे.
बेनेटवर हार्ट ट्रान्सप्लान्टची सर्जरी करणारे डॉ. बार्टली ग्रिफिथ यांच्या माहितीनुसार, काही व्हायरस हे लपलेले असतात. याचा अर्थ असा की आजारपण निर्माण न करता ते शरिरात राहतात. बेनेट यांच्या मृत्युचे कारण हा व्हायरस असण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप याचा तपास सुरु आहे. जर बेनेट यांच्या मृत्यूचे कारण केवळ डुक्कराच्या ह्रद्यातील व्हायरस इतकेच असेल तर याचाच अर्थ अशा शस्त्रक्रिया आगामी काळात झाल्या आणि व्हायरसची काळजी घेतली तर माणसांना डुक्करांचे ह्रद्य बसवणे शक्य होणार आहे. हा व्हायरस डॉक्टरांच्या नजरेतून सुटू नये, यासाठी अधिक चाचण्या आणि काळजी घेण्याची गरज असल्याचे मतही तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करीत आहेत.
डेव्हीड बेनेट यांची परिस्थिती मानवी हार्ट ट्रान्सप्लान्टसाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले होते. मानवी ह्रद्य त्यांना बसवता येणे अशक्य होते. अशा स्थितीत त्यांचा जीव वाचवण्याचा निर्णय़ घेण्यात आला यासाठी डेव्हीड यांच्या शरिरात डुक्कराचे ह्रद्य बसवण्यात आले.
मेरीलँड टीमच्या माहितीनुसार, बेनेट यांना ज्या डुकराचे ह्रद्य बसवण्यात आले होते, ते डुक्कर निरोगी होते. त्याचे ह्रद्य बेनेट यांना बसवण्यापूर्वी अन्न आणि औषध विभागाच्या वतीने त्याची चाचणीही करण्यात आली होती. प्राण्यांतील संक्रमण मानवी शरिरात पसरु नये याचीही काळजी घेण्यात आली होती. ट्रान्सप्लान्टनंतर बेनेट यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणाही दिसत होती, मात्र त्यानंतर इन्फेक्शनमुळे त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यानंतर नेमके कशामुळे हे होते आहे, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या, औषधेही बदलली. त्यानंतर त्यांच्या ह्रद्याला सूज आली. ह्रद्यात पाणी जमा झाले, आणि त्याने काम करण्याचे बंद केले. अजूनही या प्रकरणाचा योग्य तपास, चौकशी सुरु आहे.
डुकराचे ह्रद्य मानवी शरिरात योग्य स्थितीत राहावे यासाठी त्यात जेनेटिक बदल करण्यात आले होते. या डुकराचे १० जीन बदलण्यात आले होते. बेनेट यांच्या शरिराने या ह्रद्याला प्रतिसाद द्यावा यासाठी ६ मानवी जीनही या ह्रद्यात टाकण्यात आले होते. ऑपरेशनच्या एका दिवसाआधी डुकराचे ह्रद्य काढण्यात आले. सात तास हे ऑपरेशन सुरु होते.