VIDEO | गायीला लाथ मारत होता एकजण, संतापलेल्या गाईने जे काही हाल केले ते तुम्ही व्हिडिओ पाहा

| Updated on: Jun 25, 2023 | 2:50 PM

VIRAL VIDEO | कोणत्याही प्राण्याला हलक्यात घेऊ नका, मग तो प्राणी गरीब असला तरी, एका गाईला एका व्यक्तीने मारहाण केली. त्यानंतर त्या गाईने व्यक्तीला कशा पद्धतीने शिक्षा दिली हे तुम्हाला व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे.

VIDEO | गायीला लाथ मारत होता एकजण, संतापलेल्या गाईने जे काही हाल केले ते तुम्ही व्हिडिओ पाहा
Trending video
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : साधी आणि सगळ आणि शांत प्राण्यांमध्ये गाईचा (COW) सुध्दा नंबर येतो. खूप कमीवेळा गाईने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे ज्यावेळी एखाद्या गाईला (VIRAL VIDEO) तुम्ही मारहाण करता. त्यावेळी रागावलेली गाई काय करु शकते हे तुम्हाला सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका गाईशी एका व्यक्ती पंगा घेतला आहे. त्या गाईने त्या व्यक्तीला त्याचवेळी शिक्षा सुध्दा दिली आहे. त्या व्यक्तीला असं वाटलं असेल की, आपण गाईला कितीही (TRENDING VIDEO) मारहाण केली, तरी ती शांत राहिल. ज्यावेळी गाईने हल्ला केला. त्यावेळी तिथं असलेली लोकं सुध्दा घाबरली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती गाईवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. एकावेळी रागात त्या व्यक्तीने त्या गायीला लाथ मारली. त्यावेळी सुध्दा गाय शांत राहिली. त्या व्यक्तीने गाईची शेपूट पकडली आणि कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला असं वाटलं असावं की गाईची शेपूट पकडल्यानंतर ती ताब्यात राहिलं. ती व्यक्ती गाईला अधिक त्रास द्यायला लागल्यानंतर, त्या गाईने रागाच्या भरात त्या व्यक्तीवरती हल्ला केला.

हे सुद्धा वाचा

रागात असलेल्या गाईने शिक्षा दिली.

गाईने ज्यावेळी हल्ला केला, त्यावेळी त्या व्यक्तीला घाम फुटला असावा. गाईने पहिल्यांदा त्या व्यक्तीला उचलून जमिनीवर आपटला. पुन्हा शिंगांनी हल्ला केला. रागात असलेल्या गाईने लगेच त्याची पाठ सोडली नाही. ज्यावेळी ती व्यक्ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागली. त्यावेळी गाईने त्याला पुढे तसाचं घसटतं नेला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या बाजूला असलेली लोकं फक्त ओरडत राहिली. गाईचा राग पाहून कोणीही त्या व्यक्तीला वाचवायला गेलं नाही.

सध्याचा व्हिडीओ @ExtremeFaiIs नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत 13 लाखांपेक्षा अधिक व्यूज आले आहेत. ही घटना पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.