भारतीय कादंबरीकार आणि साहित्यिक सलमान रश्दी यांचं नाव साहित्याच्या नोबेल पुरस्काराबद्दल चर्चेत आहे. यावेळी सलमान रश्दी यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळू शकतो, असा दावा केला जातोय. 5 ऑक्टोबरला, आज साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहे. सलमान रश्दी कोण आणि त्याच्या नावाची चर्चा का होतीये जाणून घेऊयात.
सलमान रश्दी हे लंडन मध्ये राहणारे भारतीय वंशाचे साहित्यिक आहेत. जन्म – 19 जून 1947 मुंबई, महाराष्ट्र, भारत. सलमान हे मुस्लिम कुटुंबातील आहेत.
सलमान रश्दी आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून लोकांच्या अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवत आहेत. त्यांच्या पुस्तकांमुळे ते चर्चेत आहेत.
काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या ‘सॅटेनिक वर्सेज’ या वादग्रस्त पुस्तकामुळे करण्यात आला होता.
सलमान रश्दी यांनी आतापर्यंत अनेक महान नोबेल लिहिले आहेत. रश्दी यांनी 1988 साली लिहिलेलं ‘सॅटनिक वर्सेज’ हे त्यांचे चौथे नोबेल होय.
हे नोबेल पैगंबर महंमद पैगंबर यांच्या जीवनातून प्रेरित आहे. रश्दी यांच्या या पुस्तकावर अनेकांनी इस्लामी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता.
इराणमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. या पुस्तकावरून न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यापूर्वी ‘सॅटेनिक वर्सेज’साठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.
साहित्य विश्वात सलमान रश्दी यांचं वेगळं स्थान आहे. सलमान रश्दी यांनी एकूण 14 कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
ग्रिमस, मिडनाइट्स चिल्ड्रन, लज्जा, द सॅटनिक व्हर्सेज, ॲरॉन अँड द सी ऑफ स्टोरीज, द मूर्स लास्ट सिसा, द ग्राउंड बिनिथ हिअर फीट, फ्यूरी, शालिमार द क्लाउन, द एन्चॅन्रेस ऑफ फ्लोरेन्स, लुका अँड द फायर ऑफ लाइफ, टू इयर्स एइट मंथ्सअँड ट्वेंटी-एट नाइट्स, द गोल्डन हाउस आणि क्विचोटे ही त्यांची प्रमुख पुस्तके आहेत.
त्यांच्या ‘मिडनाइट चिल्ड्रन’ या प्रसिद्ध पुस्तकासाठी त्यांना प्रतिष्ठित “आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार” हा पुरस्कार मिळालाय.
साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे सलमान रश्दी रवींद्र टागोरांनंतरचे पहिले भारतीय वंशाचे लेखक होऊ शकतात असं द गार्डियनच्या वृत्तात म्हटले आहे.