VIDEO | उंच इमारतीच्या बाल्कनीतून एकाने उडी घेतली, कमकुवत मनाच्या लोकांनी व्हिडिओ पाहू नये

| Updated on: Jun 25, 2023 | 12:02 PM

Man falling from apartment building : सध्या व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एका तरुणाने उंच इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेतली आहे. व्हायरल व्हिडीओ 2.8 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

VIDEO | उंच इमारतीच्या बाल्कनीतून एकाने उडी घेतली, कमकुवत मनाच्या लोकांनी व्हिडिओ पाहू नये
Trending video
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : कोणताही अपघात (Accident video) कधीही सांगून होत नाही. काहीवेळेला लोकं अशा चुका करतात की, त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळते. तर काहीवेळेला एका चुकीच्या व्यक्तीमुळे सगळ्यांना मोठी अडचण (viral video) निर्माण होते. संभाळून एखादी गोष्ट करीत असताना सुध्दा अपघात (Man falling from apartment building) झाले आहेत. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (trending video) झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उंचावरुन खाली पडला आहे. हा अपघाताचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

इमारतीच्या बाल्कनीत…

सोशल मीडियावर काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, लोकांच्यासाठी ते धक्कादायक असतात. काही व्हिडीओ असे असतात की ते कमकुवत लोकांनी पाहू नये. सध्या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती इमारतीच्या बाल्कनीतून खाली पडला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या इमारतीची उंची तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळी तो तरुण इमारतीच्या बाल्कनीत होता. त्यावेळी समोरच्या बिल्डींगमधील एका व्यक्तीने तो व्हिडीओ बनवला असावा अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ या कारणामुळे झाला व्हायरल

त्या इमारतीची उंची खूप आहे. त्यामध्ये कित्येक मजले आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला ती व्यक्ती घरातून बाल्कनीत आली आहे. काहीवेळात ती व्यक्ती बाल्कनीतून खाली पडली आहे. त्यामध्ये ती व्यक्ती खालच्या मजल्यावर काहीवेळ लटकली सुध्दा आहे. विशेष म्हणजे हा व्हायरल व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ खरा असल्याचा आम्ही दावा केलेला नाही. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. त्याचबरोबर काहीवेळेला काहीजण चुकीचे व्हिडीओ सुध्दा शेअर करतात.

दहा सेंकदाचा व्हिडीओ

१० सेकंदाचा व्हिडीओ यावर्षी 22 जूनला शेअर केला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 2.8 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 20 हजार पेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले की, तो वाचला की नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, कॅमेरामॅनला तो पडणार असल्याचं कसं माहित झालं.