मुंबई : लग्न (Marriage) हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा (Important) दिवस असतो. प्रत्येकाला हा दिवस खास बनवायचा असतो. एका व्यक्तीने आपले लग्न खास बनवण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबलीयं. त्याने आपल्या लग्नाच्या पत्रिकेला असा काही वेगळा लूक (Look) दिलायं की, ती लग्नपत्रिका आता चर्चेचा विषय ठरलीयं. एका व्यक्तीने आपल्या लग्नाची पत्रिका गोळ्यांच्या पत्त्याप्रमाणे तयार केलीयं. सुरूवातीला हे बघितल्यावर कोणालाच विश्वास बसणार नाही की, ही लग्नपत्रिका आहे म्हणून, कारण त्या व्यक्तीने गोळ्याच्या पत्त्यावर मागील बाजूला ज्याप्रमाणे लिहिले जाते गोळीच्या कंपनीचे नाव, त्यामध्ये असलेले घटक वगैरे लिहिले जातात त्याचप्रमाणे लग्नपत्रिका तयार केलीयं.
गोळ्यांच्या पत्त्याप्रमाणे दिसणार्या लग्न पत्रिकेत त्या व्यक्तीने स्वतःचे आणि होणाऱ्या पत्नीचे नाव लिहिले आहे. यासोबतच त्यांने लग्नाची तारीख, जेवणाची वेळ आणि लग्नाचे ठिकाणे असे सर्वकाही पत्रिकेत लिहिल्याचे दिसते आहे. त्या व्यक्तीने लग्नपत्रिका टॅबलेटच्या पत्त्यांच्या स्वरूपात बनवलीयं. ही खास लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हे लग्न 5 सप्टेंबर आहे. या पत्रिकेमधील विशेष बाब म्हणजे पत्रिकेमध्ये मित्र आणि नातेवाईक यांना लग्नाला येण्याचे आमंत्रण देखील देण्यात आलायं.
ही सोशल मीडियावर व्हायरल होणारी लग्नपत्रिका अनेकांना आवडलीयं. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून पत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीचे काैतुकही केले जातंय. पत्रिकेमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही पत्रिका तामिळनाडू येथील असल्याचे कळते आहे. ही पत्रिका सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होताना दिसते आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, आपले लग्न खास असावे आणि इतरांपेक्षा वेगळे. यामुळे असे काहीतरी वेगळे केले जाते.