Video : विमान हवेत असताना पायलट बेशुद्ध, प्रवाश्याने लढवली शक्कल, केलं विमानाचं लॅंडिंग

| Updated on: May 13, 2022 | 10:55 AM

या विमानाने बहामासमधील मार्श हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या वृत्तानुसार, विमानात पायलट आणि दोन प्रवासी उपस्थित होते. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

Video : विमान हवेत असताना पायलट बेशुद्ध, प्रवाश्याने लढवली शक्कल, केलं विमानाचं लॅंडिंग
व्हायरल व्हीडिओ
Follow us on

मुंबई : विमान सुरू आहे. प्रवासी त्यातून प्रवास करत आहेत. हे विमान हवेत असतानाच त्याचा पायलट (Pilot) बेशुद्ध झाला तर काय होईल? याची कल्पनाच न केलेली बरी. पण अशी घटना घडली आहे. त्यानंतर विमानाची धुरा एका प्रवाश्याने सांभाळली. या प्रवाशाला विमान चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. परंतु फ्लोरिडाच्या अटलांटिक किनार्‍यावर एका विमानाचा पायलट अचानक बेशुद्ध झाल्याने त्या व्यक्तीने मदतीसाठी तातडीने विनंती केली. त्याच्या हजरजबाबीपणामुळे हे विमान सुरक्षितपणे लँन्ड करू शकलं. हवाई वाहतूक नियंत्रकांना विमान सुरक्षितपणे उतरवण्यात यश आलं. LiveATC.net वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने सांगितलं की, “माझ्या समोर एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्या विमानाचा पायलट बेशुद्ध झाला आहे. मला विमान कसं चालवायचं असतं हे माहित नाही.” त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रकांच्या मदतीने त्याने हे विमान लँन्ड केलं. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.

नेमकं काय घडलं?

फ्लोरिडाच्या अटलांटिक किनार्‍यावर एका विमानाचा पायलट अचानक बेशुद्ध झाल्याने त्या व्यक्तीने मदतीसाठी तातडीने विनंती केली.त्याच्य हजरजबाबीपणामुळे हे विमान सुरक्षितपणे लँन्ड करू शकलं. हवाई वाहतूक नियंत्रकांना विमान सुरक्षितपणे उतरवण्यात यश आलं. LiveATC.net वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने सांगितलं की, “माझ्या समोर एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्या विमानाचा पायलट बेशुद्ध झाला आहे. मला विमान कसं चालवायचं असतं हे माहित नाही.” त्यानंतर फोर्ट पियर्स येथील हवाई वाहतूक नियंत्रकांनी या प्रवाश्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याला सिंगल-इंजिन सेसना 208 ची स्थिती माहित आहे का असं विचारलं. त्यावर प्रवासी म्हणाला मला याबद्दल काहीच माहीत नाही. मला फक्त फ्लोरिडाचा किनारा दिसतोय. पण हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रकांच्या मदतीने त्याने हे विमान लँन्ड केलं.

हे सुद्धा वाचा

या विमानाने बहामासमधील मार्श हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या वृत्तानुसार, विमानात पायलट आणि दोन प्रवासी उपस्थित होते. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पायलट कशामुळे बेशुद्ध पडला हे समोर आलेलं नाही. एफएएने याचा व्हीडिओमध्ये शेअर केला आहे.