टोकियो– (Tokyo)जगात अशी अनेक माणसं असतात की ती त्यांच्या विक्षिप्तपणासाठीच प्रसिद्ध असतात, अनेकदा तर त्यांच्या या विक्षिप्तपणापायी ते काहीही करतात. आणि त्यांचा हा विक्षिप्तपणाच त्यांची ओळख निर्माण करतो. अशाच एका विक्षिप्तपणाचा किस्सा जपानमध्ये (JAPAN)घडला आहे. माणसाला बाई होण्याची इच्छ किंवा बाईला माणूस इच्छा होण्याची इच्छा आपण समजू शकू, पण जपानमध्ये एका माणसाला कुत्रा (man become dog)होण्याची हौस निर्माण झाली आणि त्याच्या या हौशेमुळे सगळेच जण बुचकळ्यात पडले. जपानमध्ये राहणाऱ्या या वल्लीचे नाव टोको असे आहे. आणि आता तो कुत्राही झाला आहे. माणसापासून कुत्र्याचं रुप घेणाऱ्या टोकोने सोशल मीडियावर त्याचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो पाहून, हा माणूस आहे, यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. सध्या या फोटोची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
टोकोचे लहानपमापासूनचे स्वप्न होते की त्याला कुत्र्यासारखे जगायचे होते. आता कुणाला काय वाटेल हे सांगता येणे कठीण आहे. यासाठी जपानची एक प्रोफेशनल एजन्सी जेपेट वर्कशॉप कंपनीने त्याला मदत केली. या कंपनीने टोकोला कुली नावाच्या एका कुत्र्याच्या जातीत रुपांतर करुन दाखवले.
या टोकोच्या मनाने कुत्रा होण्याचे एवढे घेतले की त्याने यासाठी 11 लाख रुपये ( सुमारे २ दशलक्ष जपानी येन) खर्च केले. इतक्या पैशांत त्याने असा एक कॉस्च्युम तयार केला की, तो कॉस्च्युम घातल्याने टोको एकदम कुत्र्यासारखा दिसू लागला. या पेहरावात त्याला ओळखणे अशक्यच आहे.
हा कुत्र्याचा कॉस्च्युम तयार करण्यासाठी तब्बल 4० दिवस लागले. हा पेहराव तयार करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली असे हा पेहराव निर्मिती करणाऱ्या कंपनीने सांगितले आहे. माणूस आणि कुत्रा यांच्या दिसण्यात बरेच अंतर आहे, नाटकासाठी कुत्रा होणे वेगळे, पण टोकोला अगदी हुबेहुब कुत्रा दिसायचे होते. त्यासाठी मेहनतीने असा पेहराव तयार करण्यात आला.
या टोकोला जेव्हा कुली या कुत्र्याच्या जातीचीच का निवड करण्यात आली असे विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, कुली हा त्याचा सर्वाधिक आवडता कुत्रा आहे आणि तो सगळ्यात क्यूटही आहे. तसेच विशेष म्हणजे या कुत्र्याला मोठे, लांब केस असतात. अशा स्थितीत मानवी शरिराला या पेहरावात लपवणे सहज शक्यही आहे. त्यामुळेच कुली जातीच्या कुत्र्याची निवड केल्याचे टोकोने सांगतिले आहे. त्याचे कॉस्च्युम घातलेले फोटो पाहिले तर हा माणूस आहे, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.
हा पेहराव घातल्यावर हात–पाय हलवणे शक्य होते का, असा प्रश्न विचारल्यावर त्याने या पेहरावात काही अडचणी, मर्यादा येतात हे मान्य केले खरे, मात्र मानवाप्रमाणे हालचाल केली तर कुत्रा कसा वाटेल, असा प्रतिप्रश्नही त्याने केला.