भारतातील अनेक दुचाकी वाहन चालक हेल्मेट वापरत नाहीत. स्वत:च्या सुरक्षिततेकडे लक्ष न देता टू-व्हीलर चालवताना पाहून एक पोलीस आता हतबल झालेत. शेवटी त्यांनी एक नवीन कल्पना शोधून काढलीये. सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवणाऱ्या एका व्यक्तीला एका पोलिसाने चांगलीच वागणूक दिलीये.
ही क्लिप जॅकी यादव नावाच्या एका युझरने ट्विटरवर पोस्ट केलीये, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या भावाला त्याच्या लग्नात सुद्धा कुणी इतक्या आदराने फेटा घातला नसेल”
इस भाई को इतनी इज़्ज़त से तो शादी में सेहरा भी नहीं पहनाया गया होगा? pic.twitter.com/UQn1gRFypz
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) September 9, 2022
व्हिडिओला 191 हजारहून अधिक व्ह्यूज आणि 9,500 लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक पोलीस एका व्यक्तीशी बोलताना दिसतायत.
पोलीस हळूच त्या व्यक्तीच्या डोक्यात हेल्मेट घालतायत आणि त्याला वाहतुकीचे नियम समजावून सांगतायत. जणू काही पोलीस मंत्रोच्चार (स्तोत्रे) उच्चारत आहे.
त्यानंतर अधिकारी हात जोडून त्या नियम मोडणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट घालण्याची विनंती करतो. तो पुन्हा कधीही विनाहेल्मेट पकडला गेला, तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला सध्याच्या रकमेच्या पाचपट दंड ठोठावण्यात येईल, असे या पोलिसाने हिंदीत स्पष्ट केले आहे.
नेटिझन्सना हा व्हिडिओ खूप आवडलाय. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला अनोख्या पद्धतीने वागणूक दिल्याबद्दल लोकांनी अधिकाऱ्याचे कौतुक केले.