जगात सुंदर ठिकाणं असली तरी रहस्यमय ठिकाणं सुद्धा आहेत. काही ठिकाणे जी एकेकाळी खूप छान होती पण आज तिथं कोणीही राहत नाही. वर्षानुवर्षे तिथं कुणीच नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे वर्षानुवर्षे शांतताच आहे. जाणून घ्या जगातील या विचित्र आणि रहस्यमय ठिकाणांबद्दल.
एकेकाळी डिस्ने वर्ल्डशी टक्कर मानले जाणारे हे जपानचे ॲमेझॉन पार्क. हे उद्यान 1961 मध्ये बांधण्यात आले आणि अनेक वर्षे चालू राहिले परंतु हळूहळू इथे लोकांचं येणं कमी झालं, ज्यामुळे 2006 मध्ये ते बंद करावे लागले. आता इथे जाण्यास मनाई आहे. एक फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी आला तेव्हा त्याला दंड भरावा लागला.
क्रेको हे शहर दक्षिण इटलीच्या मॅटेरा प्रांतात वसलेले आहे. या शहराला घोस्ट सिटी असेही म्हणतात. हे समुद्राच्या जवळ वसलेले आहे. हे शहर खोलवर वसलेले आहे. वर्षानुवर्षे हे शहर सुनसान आहे. इथे अधूनमधून चित्रीकरण होत असते. या शहराला वारंवार भूस्खलनाचा सामना करावा लागत होता, ज्यामुळे 1963 मध्ये हे शहर रिकामे करण्यात आले होते.
मिशिगन रेल्वे स्थानक, डेट्रॉइट. एकेकाळी अमेरिकेतील सर्वात आलिशान रेल्वे स्थानकांमध्ये गणले जात होते, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या स्थानकावर 25 वर्षांपूर्वी शेवटची गाडी आली होती. आता इथे कोणी येत नाही, हो, काही लोक कधी कधी या सुंदर ठिकाणी फोटो काढण्यासाठी येतात.
इंग्लंडमधील ईस्ट ससेक्स इथे असलेला हा राजवाडा 1385 मध्ये सर एडवर्ड डालिनग्रिग यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आला. या शहरात अनेक लढाया लढल्या गेल्या पण ही इमारत टिकून राहिली. पुढे लॉर्ड कर्झन यांनी या वास्तूचा जीर्णोद्धार केला. पण आता ही इमारत रिकामी पडून आहे.
डच बेटावर बांधलेले शेवटचे घर. मेरीलँडच्या चेसापीक खाडीतील डच बेटावर एक घर आहे, जे 1888 मध्ये बांधले गेले होते. त्याचे मालक स्टीफन व्हाईट यांनी घर वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. आता इथे कोणीही जात नाही.