डीजेला लग्नात मोठी किंमत असते. अशावेळी ‘डीजे वाले बाबू’ जेव्हा लोकांच्या पसंतीचं गाणं वाजवत नाही, तेव्हा भांडणंही होतात. बरं डान्सच्या नावाखाली काहीही करणाऱ्यांबद्दल बोलू या. होय काही तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यांनी भोजपुरी गाण्यावर असा काही गोंधळ घातला की बघणारे हसत आहेत. या क्लिपमध्ये मुलांचा ग्रुप रिकामी भांडी आणि खुर्च्या घेऊन विचित्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही युझर्स म्हणतात की, आम्ही मंडप आणि केटरिंग वाल्यांची वेदना समजू शकतो.
हा व्हिडिओ कधी आणि कुठला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. या व्हिडिओला 11.3 हजार व्ह्यूज, 572 लाईक्स आणि शेकडो रिॲक्शन मिळाल्या आहेत.
एका व्यक्तीने लिहिले की, केटरिंग करणारा माणूस रडला असेल. आणखी एकाने लिहिले- एकदा नशेत मुले जनरेटरच्या आवाजावर नाचली होती.
Girls :- yha jyade instruments nhi baj rhe hai dance nhi karungi
Meanwhile Boys :- pic.twitter.com/JN3DbHiGdl
— Ankit $8 (@imoriginalankit) December 6, 2022
19 सेकंदाच्या या क्लिपमध्ये डीजेवर तरुणाईची गर्दी नाचताना दिसत आहे. भोजपुरी गाणे वाजत आहे. पण नाचता नाचता काही तरुणांनी जेवणाची रिकामी भांडी आणि प्लास्टिकच्या खुर्च्या उचलल्या.
कुणी जोरजोरात भांडी वाजवत नाचतंय, तर कुणी आपल्या डान्स मूव्ह्ज दाखवतंय. वातावरण इतके रंगतदार झाले आहे की बघणाऱ्यांना हसू आवरता येत नाही.