चोरी केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये याचं उत्तर आहे, जे पाहून तुम्हाला हसू येईल. वास्तविक, हे प्रकरण छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी विविध पोलीस ठाण्याच्या परिसरात धाड टाकून रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळीला अटक केली. पोलीस चोराची चौकशी करत असताना चोराने एसपी साहेबांना अशी उत्तरं दिली की… त्या अधिकाऱ्यासह तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना हसू आवरता आलं नाही. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप शेअर केला जात आहे.
पोलिस अधिकाऱ्याने चोराला चोरी केल्यानंतर कसे वाटले, अशी विचारणा केली. याला उत्तर देताना चोर म्हणतो – चोरी केली तेव्हा छान वाटलं पण नंतर पश्चाताप झाला. चुकीचे काम केल्याचा मला पश्चाताप झाला.
त्यानंतर तो म्हणतो की त्याला चोरीच्या मालापैकी 10,000 रुपये मिळाले होते, जे त्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या गायी, कुत्रे आणि गरिबांसाठी ब्लँकेट आणि अन्नावर खर्च केले होते. चोराचं हे उत्तर ऐकून पोलीस अधिकारी खूप हसतात.
हा व्हिडिओ २ डिसेंबर रोजी ट्विटर हँडलवर @Gulzar_sahab शेअर करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, दिलदार चोर.
दिलदार चोर ?❤️ pic.twitter.com/SSax12oh55
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) December 2, 2022
या क्लिपला आतापर्यंत १ लाख ३२ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि १० हजार लाईक्स मिळाले आहेत. 33 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चोर पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे.
चोरटा आपल्या स्टाइलमध्ये अनोखं उत्तर देत आहे. त्याचं उत्तर असं होतं की, त्याचं बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे पोलीस हसले.