बिहारमधील चोऱ्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे,हे पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल. सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बिहारमधून चोरटे चालत्या मालगाडीतून तेल चोरताना पकडले गेले आहेत.
नुकत्याच झालेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये बिहारमधील चोरांनी पाटण्याच्या प्रशासकीय उपविभाग बिहटा मधून जाणाऱ्या तेल टँकर ट्रेनला लक्ष्य केले.
हा व्हिडीओ @KhatoonShamsida नावाच्या ट्विटर युजरने शेअर केलाय. बिहारमध्ये चालत्या मालगाडीतून तेल चोरीला जाऊ लागलं. हा व्हिडिओ बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील बिहटानगर मधील आहे.
तेल चोरताना कोणीतरी मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर सोशल मीडियावर पोस्ट केला. स्थानिकांनी तेलाचे टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रेनमधून खूप हुशारीने तेल चोरी केलं. ते धावत्या ट्रेनमधून तेल काढतायत आणि ते बादलीत भारतायत.
बिहार में चलती मालगाड़ी ट्रेन से तेल होने लगा चोरी
बता दे आपको ये वीडियो बिहार के पटना जिले बिहटा नगर का है चलती हुई मालगाड़ी ट्रेन से चोरी करने मंजर। pic.twitter.com/ZpnbUSELqG— Shamsida Khatoon (@KhatoonShamsida) December 4, 2022
व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दिसेल की हे सगळं रेल्वेच्या पुलावर सूर आहे. अजिबात जीवाची पर्वा न करता हे सगळं सुरु आहे.
मालगाडी आपल्या जागेवर पोहोचण्यापूर्वीच चोरांनी ते तेल चोरून नेले. गाडी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) ऑईल डेपोच्या दिशेने जात होती.