हाच का शक्तिमान? चालत्या गाडीचं टायर बदललंय भावाने…

| Updated on: Apr 26, 2023 | 3:42 PM

आम्ही एक असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. या व्हिडिओमध्ये एक मुलगा रिक्षा चालवताना टायर बदलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर रिक्षा एका बाजूला झुकवली गेलीये. याच दरम्यान, एक मुलगा चक्क हवेत असलेलं टायर बदलण्याचा प्रयत्न करतोय.

हाच का शक्तिमान? चालत्या गाडीचं टायर बदललंय भावाने...
changing tyre in a moving auto
Follow us on

मुंबई: कोणत्याही वाहनाचे टायर पंक्चर झाल्यास ते बदलणे आवश्यक असते. अशात समजा आजूबाजूला पंक्चर-दुरुस्तीचे दुकान नसले तर स्टेपनीज स्टँडबाय ठेवावी लागते. गाडी बाजूला लावून आपण टायर बदलू शकतो. हे तर खूप सर्रास पाहायला मिळतं. पण याहीपेक्षा तुम्ही कधी चालत्या वाहनाचे टायर बदलण्याविषयी पाहिले किंवा ऐकले आहे का? आम्ही एक असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. या व्हिडिओमध्ये एक मुलगा रिक्षा चालवताना टायर बदलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर रिक्षा एका बाजूला झुकवली गेलीये. याच दरम्यान, एक मुलगा चक्क हवेत असलेलं टायर बदलण्याचा प्रयत्न करतोय.

तुम्ही चालत्या ऑटोचे टायर बदलताना पाहिले आहे का?

नट सैल केल्यानंतर हा मुलगा टायरही बाहेर काढतो. तेवढ्यात दुसरा मुलगा दुसऱ्या रिक्षातून येतो. तो लगेच त्या टायर बदलणाऱ्या मुलाच्या हातात टायर देतो. तो लगेच स्टेपनीला दोन चाकांवर चालणाऱ्या ऑटोमध्ये बसवतो. रिक्षा रस्त्यावर वेगाने धावायला तयार व्हावी म्हणून तो नट बोल्ट घट्ट करतो. ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ जुना असून तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 86 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला असून नेटकऱ्यांनी तो मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. दरम्यान, चालत्या गाडीचे टायर बदलण्यासाठी या मुलाच्या खास कौशल्याचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपलं मत मांडलं. एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं, ‘मस्त ट्रिक. आणखी एका युजरने लिहिले की, चालत्या वाहनावर टायर बदलणे ही मोठी गोष्ट आहे.