मुंबई : सध्या एका शाळेतील व्हिडीओ सोशल मीडियावर (Class Room Viral Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. तो व्हि़डीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा हसू येईल. मुलांचे काही व्हिडीओ (Viral Video)असे असतात की, ते पाहिल्यानंतर हसू आवरनं अधिक कठीण होतं. असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओला लोकांनी शेअर सुध्दा केलं आहे. हा व्हिडीओ (trending video) आतापर्यंत 12 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगा शाळेत बसला आहे. तो त्याच्या हिशोबाने अभ्यास करीत आहे.
मुलगा अभ्यास करीत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो एका वर्गात आपलं पुस्तक उघडून बसला आहे. तो त्या पुस्तकावर हात ठेवून आपल्या डोक्यावर ठेवत आहे. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा पाहणार एवढं नक्की, त्या वर्गात बाकीचे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त झाले आहेत. त्यावेळी कुणाचं लक्ष नसल्यामुळे तो मुलगा आपल्या पुस्तकातील काही गोष्टी हाताने डोक्यात घालत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु सोशल मीडियावर हा व्हिडीओ अधिक लोकांना आवडला आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओला मजेशीर कमेंट केल्या आहेत.
— NO CONTEXT HUMANS ? (@HumansNoContext) June 17, 2023
या व्हिडीओला पाहून एकाने चांगल्या कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, सध्याचं वाईफाई नॉलेज ट्रान्सफर’. आणखी एकाने लिहीलं आहे की, तो अभ्यास करतोय का ? या व्हिडीओची सगळ्यात मजेशीर गोष्टी ही आहे की, मुलगा शांत आणि एकाग्र होऊन काम करीत आहे. या व्हिडीओला 79.5 हजार लोकांनी लाईक केले आहे. सोशस मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ते पाहून अनेकांना हसू आवरत नाही.