मुलांना संस्कार देणं चांगल्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे, असं म्हटलं जातं. ज्या गोष्टी त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि योग्य पद्धतीने वाढण्यासाठी प्रेरणा देतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय जो खूप गोंडस व्हिडीओ आहे. इतक्या लहान वयात या मुलाला कुणी बरं हे सगळं शिकवलं असेल की ते बघून बघून शिकलं असेल असा प्रश्न पडतो.
आजच्या काळात आपण पाहिले असेलच की, अनेकांना प्राणी-पक्ष्यांपासून दूर राहणे आवडते, तर पशु-पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्यांची कमतरता नाही आणि अशा लोकांना त्यांच्या जवळ राहायला आवडते.
पण ही गोष्ट लहान मुलांमध्ये दिसली तर मोठा दिलासा मिळतो. आता ही क्लिप बघा जिथे एक लहान मूल आपल्या हातांनी तीन पक्ष्यांना खायला घालत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पक्ष्यांचा एक ग्रुप मुलाच्या समोर बसला आहे आणि मुलाने हातात वाटी धरली आहे.
या वाटीमधून तो पक्षाला खाऊ देतोय आणि पक्षी सुद्धा ते आनंदाने खातायत. मूल अन्न खात असतं. तो त्या वाटीतून आलटून पालटून तीनही पक्ष्यांना खाऊ घालतो.
Empathy, Compassion, Kindness !
This little Boy is teaching us All ??#BeHumane
(VC : SM ) pic.twitter.com/laq7dxmxrV
— Sonal Goel IAS (@sonalgoelias) November 29, 2022
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी शेअर केला आहे. २६ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओ पाहिला असून त्यावर अनेक कमेंट सुद्धा येत आहेत.