सोशल मीडियाच्या दुनियेत वडील आणि मुलीशी संबंधित अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओजमध्ये मुलांची वडिलांसोबतची मस्ती पाहायला मिळते, काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारे असतात, तर काही पाहून दिलासा मिळतो. पण याशिवाय काही व्हिडिओ बघून लोक स्तब्ध होतात. असाच एक व्हिडिओ आजकाल पाहायला मिळाला. हे पाहून तुम्ही म्हणाल की, मुलगी खरोखरच शंभर मुलांच्या बरोबरीची असते.
श्रवण कुमारबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकले असेल… त्यांची ही कहाणी आजच्या मुलांसाठी प्रेरणादायी तर आहेच पण प्रत्येक पालकाची इच्छा असते की, त्यांचे मूलही श्रवण कुमारांसारखे आज्ञाधारक असावे!
तुम्हालाही असं वाटत असेल, तर या मुलीकडे बघा, जी तिच्या आंधळ्या आई-वडिलांची दृष्टी बनून राहते. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की रडाल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी शाळेच्या ड्रेसमध्ये आई-वडिलांसोबत फूड स्टॉलवर बसली आहे.
ही क्लिप पाहून तुम्हाला समजलं असेलच की मुलीचे आई-वडील अंध आहेत आणि त्यांची मुलगी त्यांना मदत करताना दिसत आहे आणि मग ती त्यांना मदत करताना दिसते. हा व्हिडिओ तिथे बसलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे, जो आता व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ mith_mumbaikar नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सहा लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आणि लाखो लोकांनी तो पाहिला आहे.
एका युझरने लिहिले, ‘हा व्हिडिओ खरंच क्यूट आहे, असे व्हिडिओ क्वचितच दिसतात’, तर दुसऱ्या एका युझरने लिहिले, ‘अशा मुलींना पाहणे अभिमानास्पद आहे.’