नाशिक: महाराष्ट्रातील नाशिकमधील भारतातील आवडत्या स्ट्रीट फूड पाणी पुरीचा छोटासा स्टॉल चालवणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या जोडप्याला बोलताही येत नाही आणि ऐकूही येत नाही. पाणी-पुरी विकणाऱ्या या जोडप्याचा व्हिडीओ इंटरनेटवर लोकांची मनं जिंकत आहे. इन्स्टाग्राम फूड ब्लॉगर ‘स्ट्रीट फूड रेसिपीज’ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हे कपल ग्राहकाशी संवाद साधण्यासाठी हावभाव करताना दिसतंय. संवाद साधण्यासाठी स्टॉलवर काही गोष्टी लिहिल्यात, तर काही हातवारे करून सांगतात.
या व्हिडीओमध्ये ही महिला ग्राहकाला हावभाव करून मसाल्याबद्दल विचारताना दिसतीये. नाशिकच्या आडगाव नाका इथल्या जत्रा हॉटेलजवळ हा स्टॉल उभारण्यात आलाय.
हे जोडपं घरात सगळं काही बनवतात. कॅमेऱ्यात एक स्वादिष्ट दिसणारी थाळीही पाहायला मिळते, त्यात पाणी-पुरी तयार करण्यात आली होती. इंटरनेट वापरकर्त्यांनी या स्टॉलचे खूप कौतुक केले.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘यामुळे तुम्ही भावूक व्हाल आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. नाशिकमध्ये मूक-बधिर दाम्पत्य पाणीपुरीचा स्टॉल चालवतात. ते जे काही सर्व्ह करतात ते सर्व त्यांनी घरगुती बनवलेले असते, अगदी पुरीसुद्धा. ते अन्न सर्व्ह करताना स्वच्छतेची काळजी घेतात. हे जोडपे खऱ्या अर्थाने प्रभावी आहे, आपल्या पिढीने यातून नक्कीच काही शिकले पाहिजे.”
या व्हिडिओवर हजारो प्रतिक्रिया आल्यात, ३७ लाख व्ह्यूज मिळालेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने लिहिले की, “प्रत्येकाने इथे येऊन आपले मनोबल वाढवावे!”