एकदम स्वस्त आणि मस्त अनलिमिटेड जेवण, पण ऑर्डर द्यायची असेल तर!

| Updated on: Mar 14, 2023 | 12:41 PM

रेस्टॉरंटच्या भिंतींवर हे पोस्टर चिकटवण्यात आले आहे. इंदूरमधील कर्णावत रेस्टॉरंटमध्ये 60 रुपयांत अनलिमिटेड जेवण दिले जाते. माफक दरात अमर्याद जेवण देऊन आपण लोकांना मदत करत आहोत असे अरविंद यांना वाटते.

एकदम स्वस्त आणि मस्त अनलिमिटेड जेवण, पण ऑर्डर द्यायची असेल तर!
जेवणावरुन झालेल्या वादातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Social Media
Follow us on

इंदूर: अन्न वाया घालवणे ही चांगली गोष्ट नाही हे आपल्या सर्वांना माहित आहे. विशेषत: अशा देशात जिथे अजूनही मोठ्या संख्येने लोक दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन जगत आहेत. जे लोक अन्न वाया घालवतात त्यांना सूचना दिल्या जातात की त्यांनी उपाशी लोकांना अन्न वाटप करावे. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंदूरमधील एका रेस्टॉरंटमध्ये अन्न वाया घालवल्याबद्दल लोकांना दंड ठोठावला जातो. जर तुम्ही इथे जेवणाची ऑर्डर दिली असेल तर ते पूर्णपणे संपवलेले बरे. घेतलेलं पूर्ण अन्न न संपवल्यास तुम्हाला 50 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

ग्राहकांनी आपल्या ताटात अजिबात अन्न सोडू नये, असा इशारा देण्यात आला आहे. रेस्टॉरंटच्या भिंतींवर हे पोस्टर चिकटवण्यात आले आहे. इंदूरमधील कर्णावत रेस्टॉरंटमध्ये 60 रुपयांत अनलिमिटेड जेवण दिले जाते. मात्र गरजेपेक्षा जास्त ऑर्डर देण्यापूर्वी लोकांना विचार करावा लागेल, अन्यथा 50 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो, कारण हे रेस्टॉरंट अन्न वाया घालवल्याबद्दल 50 रुपये दंड आकारते. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून फलक त्यांना लावावा लागलाय.

लोकांमध्ये अन्नाचा अपव्यय न करण्याची सवय लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेस्टॉरंटचे मालक अरविंद सिंह कर्णावत यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्वसामान्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की शेतकरी मोठ्या कष्टाने आपले पीक तयार करतात आणि देशात असे लोक आहेत ज्यांना दोन वेळचे जेवण देखील परवडत नाही. माफक दरात अमर्याद जेवण देऊन आपण लोकांना मदत करत आहोत असे अरविंद यांना वाटते पण लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यावा असे त्यांना वाटत नाही. दंड ठोठावल्यानंतर ग्राहक अन्न फेकून देत नाहीत, असेही ते म्हणाले. त्याऐवजी गरजूंना अन्नवाटप केले जाते.