डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी जशा दिसतात तशाच असतात असं नाही. हे वाक्य आपण नेहमी ऐकत आलोय. पण या वाक्यावर सहज विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. सहसा असं होत नाही, जे दिसतं ते तसंच असतं नाही का? असतात काही गोष्टी अपवाद असतात. हा व्हिडीओ या गोष्टीला अपवाद आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसेल की, “दिसतं तसं नसतं म्हणून सारं जग फसतं!” हा व्हिडीओ पाहताना वाटतं, काय ह्यात काय विशेष असणारे. साधंसुधं पान तर आहे झाडाचं! पण जरा वेळ द्या. हा व्हिडीओ नीट बघा. आधी एकदम साधारण वाटणारा हा व्हिडीओ काहीच सेकंदात नजरेला एक वेगळंच सुख देऊन जातो.
या व्हिडिओच्या सुरुवातीला एक माणूस कोरड्या पानासारखं दिसणारं काहीतरी दाखवताना दिसतोय.तो व्यक्ती हे वाळलेलं पान पकडण्याचा प्रयत्न करतो. त्या नंतर कमाल होते, कमाल!
— Unexpected Videos (@Unexpec1ed) September 3, 2022
सुकलेलं पान वाटणारं हे पान हात लावल्यावर एकदम एक सुंदर फुलपाखरू होतं. त्या व्यक्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच फुलपाखरू उडून पुन्हा पानाचे रूप धारण करते.
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सला आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेलाय.