मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. विशेष म्हणजे काही व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडतात देखील. बऱ्याच वेळा मेकअपचे व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक व्हिडीओंमध्ये तर मेकअप करण्याच्या खास टिप्स दिल्या जातात. इथे प्रत्येकाला मेकअप करून सुंदर दिसायचे असते. असे बरेच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात की, मेकअप झाल्यानंतर त्या महिलेला ओळखणे देखील शक्य होत नाही. सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर तो वाऱ्यासारखा पसरताना दिसतो.
सोशल मीडियावर 2023 मध्ये एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. विशेष म्हणजे 2023 मध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला तो व्हिडीओ आहे. 2023 मध्ये टीकटाॅकवर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. तर जाणून घेऊयात या व्हिडीओमध्ये असे काय आहे की, जो व्हिडीओ इतका जास्त व्हायरल झाला. टीकटाॅकच्या डाटाच्या रिपोर्टनुसार हा 504 मिलियन लोकांनी व्हिडीओ बघितला आहे.
मार्च 2023 मध्ये व्हिडीओ अपलोड करण्यात आला. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक मुलगी दाखवण्यात आलीये. ही मुलगी मेकअप करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मेकअप करत असणाऱ्या मुलीचा रंग डार्क दिसतोय. ती अनेक उत्पादने आपल्या चेहऱ्याला लावताना दिसत आहे. तिने डोळ्यांचा देखील खास मेकअप केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तिने अगोदरच केसांची खास हेअरस्टाईल केलीये. या मुलीने अनेक स्क्रिम आपल्या चेहऱ्याला लावल्याचे बघायला मिळतंय. अनेकांना या मुलीची मेकअप करण्याची स्टाईल आवडल्याचे बघायला मिळतंय. लोकांनी या मुलीच्या व्हिडीओचे काैतुक केले आहे. कारण बऱ्याच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये चेहरा अधिक गोरा करण्यावर भर दिला जात असल्याचे बघायला मिळते.
अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत सुंदर दिसत असल्याचे त्या मुलीला म्हटले आहे. या व्हिडीओची सर्वात खास गोष्ट म्हणजे जगभरातील लोकांनी हा व्हिडीओ परत परत बघितला आहे. 2023 मध्ये टिकटाॅकवर सर्वाधिक बघितला जाणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच धमाल केल्याचे देखील बघायला मिळते. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे.