प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी प्राणी त्यात मस्ती करताना दिसतात. कधी माणसं प्राण्यांसोबत मस्ती करताना दिसतात. कधी काय तर कधी काय. हत्ती, कुत्रे, आजकाल तर चित्त्याचे व्हिडीओज व्हायरल होतायत. हा व्हिडीओ आहे सिंहाचा. या व्हिडिओत हा माणूस सिंहाशी गप्पा मारतोय. हे जरा हटके आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही विचित्र लोकं पाहिले असतील. यापैकी काही लोक विचार न करता काहीही करू शकतात. हा व्हिडीओ बघून हा माणूस काय त्या सिंहाशी बोलतोय की काय असा प्रश्न पडतोय.
हा माणूस आधी सिंहाशी बोलतोय. काहीतरी समजून सांगतोय काय असं वाटतं. उदारता दाखवण्याच्या प्रयत्नात तो आपला जीव धोक्यात घालतोय. व्हायरल व्हिडिओ अवश्य पाहा…
Man climbs into lion enclosure to “talk to the lions” pic.twitter.com/leSlYNzM29
— Idiots Nearly Dying (@IdiotsNearlydyi) September 12, 2022
माणसू सिंहाशी शांतपणे बोलतोय, पुढे सिंह रागारागाने त्या माणसाच्या हातावर पंजा मारतो. एवढेच नव्हे तर सिंह गर्जना करू लागतो.
नंतर हा सिंह त्या व्यक्तीच्या पायावर हल्ला करण्यास सुरुवात करतो. हा व्हिडीओ भयानक आहे. यात सिंह प्रचंड चिडलेला दिसतोय.
अवघ्या 45 सेकंदाच्या या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सिंहांशी बोलण्यासाठी’ ही व्यक्ती सिंहाच्या परिसरात गेलीये.
हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला हा व्हिडिओ ट्विटर खरोखरच त्या व्यक्तीच्या मूर्खपणाच्या कृत्यामुळे खूप चर्चेत आहे.
हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला असून हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.