मुंबई: सध्या आंब्याचा हंगाम सुरू असून लोक आपल्या आवडत्या फळाची खरेदी करून त्याचा आस्वाद घेत आहेत. आंबा विक्रेतेही लोकांना नवीन पद्धतीने आंबे विकताना दिसत आहेत. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक आंबा विक्रेता आपला आंबा अशा प्रकारे विकताना दिसत आहे की लोकांना प्रसिद्ध गायिका शकीराची आठवण येते. कारण या सर्वसामान्य विक्रेत्याने शकीराची कॉपी केली आहे.
हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे. त्यात एक दुकानदार आंब्याने भरलेल्या गाडीसमोर उभा आंब्याची विक्री अनोख्या स्टाईलमध्ये करताना दिसत आहे. यावेळी तो शकीराचं वाका-वाका गाणं आपल्या स्टाईलमध्ये गाताना दिसत आहे. लोकांचं लक्ष त्याच्याकडे जाईल आणि आंब्याची विक्री चांगली होईल अशा पद्धतीने त्यांनी या गाण्याचे बोल बनवले आहेत.
आंबा आंबा-आंबा ये ये…’ असं तो म्हणताना ऐकू येतो, ‘आंबा वाला आंबा-आंबा ये ये…’ ! वाका वाका सारखंच हे गाणं त्याने बनवलं आहे ज्यामुळे खरोखरच लोक आकर्षित होतायत. त्याच स्वरात तो ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वाका वाका धुनवर आपलं गाणं सेट करून तो नेमक्या त्याच शैलीत गात आहे. सुरुवातीला हा सर्वसामान्य विक्रेता वाका-वाका गात आहे. सध्या हा आंबा विक्रेता आपल्या अनोख्या शैलीत आंबा विकून प्रसिद्ध होत आहे.
याआधीही अनेकदा स्ट्रीट फूड किंवा फळे विकणाऱ्या दुकानदारांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी कच्चा बदाम आणि पेरूचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो लोकांना खूप आवडला आणि जबरदस्त शेअर केला. आता पाकिस्तानमधून हा व्हिडिओ समोर आला आहे.