काही लोकं वेडे असतात ते कुठेही काहीही करू शकतात. ते रस्त्यावरच विचित्र गोष्टी करू लागतात, ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो. तसे, जेव्हा लोक मद्यधुंद असतात तेव्हा हे पाहणाऱ्याला तर दिसून येतं. पण ते दारूच्या नशेत काय करत आहेत, का करताहेत आणि कुठे करताहेत हे त्यांना मात्र समजत नाही. अशा परिस्थितीत काही वेळा लोक अपघातांचे बळीही ठरतात. यासंबंधित एक व्हिडीओ हल्ली सोशलमीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दारूच्या नशेत एखादी व्यक्ती रस्त्यावर असा वेडेपणा करू लागते की तो एका गंभीर अपघाताला बळी पडतो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दारूच्या नशेत असणारा माणूस अचानक रस्त्यावर गोंधळ करतो. तो स्वतःला हल्क इतकाच ताकदवान समजतो आणि उडी मारून चालती बस थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण बसच्या वर उडी मारताच काचेवर आदळतो, ज्यामुळे काच फुटते, तो खाली पडतो.
बघता बघता असं वाटतं की, ज्या पद्धतीने तो पडला, त्यामुळे त्याला खूप इजा झाली असावी. आता त्याने हे वेडेवाकडे आणि जीवघेणे कृत्य का केले, हे कळायला मार्ग नाही.
पण त्याचा वेडेपणा त्याचा जीवही घेऊ शकत होता. सुदैवाने, बस वेगात नव्हती आणि त्याने उडी मारताच बस चालकाने ब्रेक लावला.
He thinks that he is the HULK #Hulk #Viral #Trending pic.twitter.com/L8KDdrRNah
— r/GharKeKalesh (@rGharKeKalesh) November 10, 2022
हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @rGharKeKalesh नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या २० सेकंदांचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच गूजबॅम्प्स देईल.
तसे पाहिले तर, रस्ते अपघातांशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यातील काही खूप आश्चर्यकारक असतात. यातील बहुतांश अपघात हे निष्काळजीपणामुळे आणि लोकांच्या चुकांमुळे होतात. म्हणूनच रस्त्यावर नेहमी जपून चालावे, असे सांगितले जाते.