तुम्ही हत्तीला कधी X-ray काढताना पाहिलंय का? खूप खूप गोंडस व्हिडीओ

| Updated on: Dec 08, 2022 | 5:19 PM

या व्हिडीओमध्ये एका हत्तीचा इतर रुग्णांप्रमाणे X-ray काढला जातोय.

तुम्ही हत्तीला कधी X-ray काढताना पाहिलंय का? खूप खूप गोंडस व्हिडीओ
elephant x ray
Image Credit source: Social Media
Follow us on

एक काळ असा होता की हत्तींपेक्षाही महाकाय प्राणी पृथ्वीवर होते. पण ते नामशेष झाल्यानंतर हत्ती सध्या पृथ्वीवरचा सर्वात मोठा आणि वजनदार प्राणी आहे, ज्याला ‘जंगलाचा राजा’ सुद्धा घाबरतो. बरं, हत्ती हे बुद्धिमान प्राणीही मानले जातात, जे कधीकधी त्यांची बुद्धिमत्ता अशा प्रकारे दाखवतात की जग पाहतच राहते. हत्ती फिरताना, इतर प्राण्यांशी लढताना पाहिले असतील, पण हत्तीला रुग्णांप्रमाणे कधी X-ray काढताना पाहिलंय का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप आवडतोय.

या व्हिडीओमध्ये एका हत्तीचा इतर रुग्णांप्रमाणे X-ray काढला जातोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती हत्तीला X-ray रुममध्ये घेऊन येत आहे.

यानंतर हत्तीला जमिनीवर झोपण्यास सांगितलं जातं. मग हत्ती लगेच त्याची आज्ञा पाळतो आणि जमिनीवर पडून राहतो आणि ती व्यक्ती त्याच्या मानेखाली एक छोटे बोर्डासारखे यंत्र ठेवते.

त्यानंतर काही सेकंदानंतर ते यंत्र काढून दुसरे यंत्र बसविले जाते. यानंतर हत्तीच्या शरीराचा संपूर्ण एक्स-रे मोठ्या उपकरणाने केला जातो.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हत्तीला सांगितले जाते तसे तो करत जातो. हत्तीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ikaveri नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून, ” आमची खात्री आहे की X-ray साठी इतका सहकार्य करणारा रुग्ण तुम्ही कधीच पाहिला नसेल”,असे कॅप्शन देण्यात आले आहे.

एक मिनिट 45 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.