समजा आपण एखाद्या पार्टीत गेलो. पार्टी जंगलात (Outdoor Party) असली. आपण मस्त एन्जॉय करतोय आणि मध्येच आपल्याला वाघ दिसला तर? बापरे कल्पना सुद्धा करवत नाही. एन्जॉय करता अचानक असं काही झाल्यावर चांगलीच वाट लागत असेल नाही? एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. ही एका जंगलातली पार्टी दिसतेय. सगळीकडे छान लाईट्स लावलेल्या आहेत. पार्टीचा माहोल आहे. अचानक एक वाघीण येते. हा माणूस वाघिणीला बघून वर झाडावर चढतो. बरं आता आपल्याला किंवा त्यालाही कदाचित वाटलं असेल की झाडावर चढल्याने वाघिणीचा पिच्छा सुटेल. तसं होत नाही. वाघीण जिद्दी! वाघीण त्याच्या मागे झाडावर (Tigress Climbs A Tree) चढते.
काही झाडं लाईटने सजवलेली आहेत. सुंदर, छान पार्टीचा माहोल आहे. एखादी पार्टी सुरू आहे असं दिसतंय. एका लाईट लावलेल्या झाडाच्या खोडाजवळ खाली वाघीण दिसतेय.
व्हिडीओ सुरु झाला की वाघीण अचानक वर झाडावर चढताना दिसते. जसा कॅमेरा वर जातो, आपल्या लक्षात येतं की त्या झाडावर एक माणूस आहे.
वाघीण खूप झपाझप झाडावर चढते. त्या लाईट मध्ये तर ती आणखी डेंजर दिसते. जेव्हा वाघीण त्याच्या मागे जाते तेव्हा एकदम वर गेल्यावर माणूस त्या वाघिणीला लाथ मारताना दिसतो. यावरून वाघिणीला घाबरून तो माणूस झाडावर चढलेला असावा असा अंदाज लावता येऊ शकतो.
हा व्हिडीओ 5 जुलै रोजी Instagram पेज Lions.Habitat वरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
ही क्लिप पाहून लोक आश्चर्यचकित झालेत. या क्लिपला आतापर्यंत २ लाख ४९ हजारांहून अधिक लाईक्स आणि १६.८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत.
काहींना ही क्लिप धक्कादायक वाटली, तर काही युझर्स त्यावर गंमतीशीर म्हणून हसत आहेत. त्याचवेळी काही युजर्सनी कॅमेरामन काय करतोय? तो मदत करण्याऐवजी त्याचं चित्रीकरण करतोय असं म्हटलंय.