Jugaad Video : कामगाराने बनवला ड्रिल मशीनपासून पंखा, १ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडिओ

| Updated on: May 02, 2023 | 9:48 AM

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कंस्ट्रक्शन साईड परिसरात आराम करीत आहेत. विशेष म्हणजे तिथं पंख्याची व्यवस्था नाही. त्या व्यक्तीला अधिक गर्दीचा अधिक त्रास होत असल्यामुळे, त्याने ड्रिलिंग मशीनपासून (Drill Machine) पंखा (Fan) तयार केला आहे.

Jugaad Video : कामगाराने बनवला ड्रिल मशीनपासून पंखा, १ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडिओ
Jugaad Video
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल (Jugaad Video) होईल, हे कोणीचं सांगू शकत नाही. कधी कोणी घरी कार तयार करतंय, तर कधी कोणी हेलिकॉप्टर तयार करतंय, तर कधी कोणी घरातील साहित्य एकत्र करुन स्कुटर तयार करतंय. सध्या अशाचं पद्धतीचा एक जुगाड व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओतला (viral video) प्रकार पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका व्यक्तीने जुगाड केला आहे. तो जुगाड अनेक व्यक्तींना आवडला आहे. एका व्यक्तीने आपली गर्मीपासून सुटका व्हावी यासाठी जुगाड केला आहे. परंतु हा जुगाड खतरनाक असल्यामुळे लोकांनी त्या व्यक्तीला सल्ला द्यायला सुरुवात केली आहे. व्हिडीओत पाहा त्याने काय जुगाड केलाय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कंस्ट्रक्शन साईड परिसरात आराम करीत आहेत. विशेष म्हणजे तिथं पंख्याची व्यवस्था नाही. त्या व्यक्तीला अधिक गर्दीचा अधिक त्रास होत असल्यामुळे, त्याने ड्रिल मशीनपासून (Drill Machine) पंखा (Fan) तयार केला आहे. त्या व्यक्तीने ड्रिलिंग मशीनला लोखंडी रॉडला उलटे टांगून त्यात टी-शर्ट अडकवला आहे. मशीन सुरू केल्यानंतर आणि मशीनचा पुढचा भाग फिरु लागतो, त्यावेळी बांधलेला शर्टही पंख्यासारखा फिरत आहे. शर्ट पंख्यासारखी हवा देत आहे.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती civilengineeriing नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या पेजवरती तुम्हाला अशा पद्धतीचे मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ त्या पेजवरती फेब्रुवारी महिन्यात शेअर करण्यात आला होता. त्या व्हिडीओला आतापर्यंत एक करोड लोकांनी पाहिलं आहे. चार लाख लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी डोकं धरलं आहे. समजा ही मशीन खाली पडली, तर त्या मुलाचं काय होईल अशी एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, शूर व्यक्ती, मशीन पडली तर? दुसर्‍याने लिहिले, जर मशीन पडली तर आत्मा परमात्म्याला भेटेल. तिसर्‍याने युजरने लिहिले की, मजूर जो अभियंता व्हायला हवा होता. या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे? ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा