मुंबई: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवे व्हिडीओ (Video) पाहायला मिळतात. काही चांगले, तर काही वाईट व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. दोन मुलं पुराच्या पाण्यातून वाहून जात असताना बापाने (Father) जिवाची बाजी लावून दोघांना नदीतून बाहेर काढलं आहे. त्यामुळे त्या वडिलांचं सोशल मीडियावर अधिक कौतुक पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सगळं दृष्ट पाहायला मिळत आहे.
उफनती नदीमध्ये दोन मुलं अडकली आहेत. त्यांना वाचवण्यासाठी मुलाचे वडिल पाण्यात उतरतात. त्या मुलापर्यंत पोहोचतात. तिथं गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह अधिक झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. वडीलांनी मुलांना घट्ट पकडलं आहे. ते त्यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यावेळी किनारी बसलेला एकजण व्हिडीओ काढत आहे. दुसरे काहीजण किनारी बसून बघ्याची भूमिका घेत आहेत. परंतु मुलांच्या वडिलांना कोणी मदत करीत नाही. शेवटी किनाऱ्यावर वडिल ज्यावेळी दोन मुलांना घेऊन येतात. त्यावेळी किनाऱ्यावरील मंडळी त्यांना हात देण्यासाठी तिथं जात असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
He is a hero! ?pic.twitter.com/wKcUKVQpmH
— Figen (@TheFigen_) December 21, 2022
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. @TheFigene या ट्विटरच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ तीन मिलियन लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे तीन हजारपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडीओ लाईक केले आहे. पाहा व्हिडीओ कशा पद्धतीच्या कमेंट आल्या आहेत.