Ravi Kumar Dahiya | फायनलमध्ये एन्ट्री मारताच भारतात जल्लोष, रवीकुमार दहियाचे कुटुंबीय थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ

| Updated on: Aug 04, 2021 | 7:51 PM

सोशल मीडियावर तर रवीकुमार दहियाच्या नावाचा जयजयकार केला जातोय. दहियाच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्याच्या विजयावर नाचत आनंद साजरा केला आहे.

Ravi Kumar Dahiya | फायनलमध्ये एन्ट्री मारताच भारतात जल्लोष, रवीकुमार दहियाचे कुटुंबीय थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ
ravi-dahiya
Follow us on

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मध्ये (Tokyo Olympics) भारतीय पैलवान रवीकुमार दहियाने (Ravi Kumar Dahiya)कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये फायनलपर्यंत मजल मारली आहे. दहियाने फायनलमध्ये एन्ट्री मारताच भारतात जल्लोष सुरु आहे. सोशल मीडियावर तर रवीकुमार दहियाच्या नावाचा जयजयकार केला जातोय. दहियाच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्याच्या विजयावर नाचत आनंद साजरा केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Tokyo Olympics 2021 Ravi Dahiya wins wrestling semi final match people congratulating him on social media)

रवीकुमारच्या विजयानंतर गावात मोठा जल्लोष

रवीच्या या दमदार यशानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. ट्विटर तसेच फेसबुकवर #रविकुमार नावाने भन्नाट ट्विट्स शेअर केले जात आहेत. विशेष म्हणजे रवीकुमारच्या विजयानंतर त्याच्या गावातसुद्धा मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय. सोनीपत येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना आनंद गगनात मावत नाहीये. सामना जिंकल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आनंद साजरा केला आहे. त्यांनी नाचत- नाचत आपला आनंद व्यक्त केला आहे.

रवीकुमारने कझाकिस्तानच्या नूरिसलामला नमवलं

दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिकच्या 57 किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा सामना कझाकिस्तानच्या नूरिसलामसोबत होता. दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही खेळाडूंमध्ये 6-6 मिनीटांचे दोन राऊंड झाले. पहिल्या राऊंडमध्ये लीड बनवण्याच्या प्रयत्नात रवीकुमार नूरिसलामच्या डावपेचात अडकला. त्याचा परिणाम म्हणून रवी 7 पॉईंट्सने पिछाडीवर गेला. मात्र, हान न मानता रवीने शेवटच्या 50 सेकंदांमध्ये नूरिसलामचा चितपट केलं आणि फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. यासोबतच त्यानं आपलं रौप्य पदकही निश्चित केलं आहे. आता फायनलमध्ये रवीकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.

इतर बातम्या :

भारतासाठी कही खुशी, कही गम, लवलीनाला कांस्य, पैलवान रवीचं पदक निश्चित, महिला हॉकी लढतीकडे लक्ष

#indvspak: भारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने, टी-20 सामन्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

पुण्यातील ‘ती’ मद्यधुंद तरुणी आधी रस्त्यावर झोपली, नंतर लोकांना शिवीगाळ केली, पोलीस दिसताच पोबारा

(Tokyo Olympics 2021 Ravi Dahiya wins wrestling semi final match people congratulating him on social media)