Video | कासवाचा अजब कारनामा, मांजरीवर केला अचानकपणे हल्ला, पुढे काय झालं ?

| Updated on: Dec 04, 2021 | 7:31 AM

कासव कोणावर हल्ला करेल असे आपल्याला चुकूनही वाटणार नाही. मात्र, या व्हिडीओमध्ये कासवाने अजब कारमाना करुन दाखवलाय. त्याने थेट मांजरीची खोड काढलीय. विशेष म्हणजे कासवाच्या या हरकतीमुळे मांजर चांगलीच घबरली आहे.

Video | कासवाचा अजब कारनामा, मांजरीवर केला अचानकपणे हल्ला, पुढे काय झालं ?
CAT AND TORTOISE
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओना तर आवडीने पाहिले जाते. यामध्ये काही व्हिडीओ हे मांजर, ससा, कुत्रा, कासव, अस्वल, हरिण अशा प्राण्यांचे असतात. सध्या तर एक अजबगजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कासवाने मांजरीची चांगलीच मज्जा घेतली आहे. कासावाला पाहून मांजरीने धूम ठोकलीय.

कासवाने करुन दाखवला अजब कारनामा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक मांजर आणि कासव दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर मांजर ही चंचल आपल्या शिकारीला एका क्षणात पकडणारी असते. तर दुसरीकडे कासव हा अत्यंत हळू चालणारे आणि आपले काम अत्यंत धीम्या गतीने करणारा उभयचर प्राणी आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये कासवाने अजब कारमाना करुन दाखवलाय. त्याने थेट मांजरीची खोड काढलीय. विशेष म्हणजे कासवाच्या या हरकतीमुळे मांजर चांगलीच घाबरली आहे.

मांजर शांतपणे उभी, अचानकपणे कासवाचा हल्ला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तांबड्या-पांढऱ्या रंगाच्या मांजरीवर कासवाने हल्ला केलाय. समोर दिसणारे कासव आपल्याला काहीही उपद्रव करणार नाही, असे मांजरीला वाटले असावे. कदाचित याच कारणामुळे मांजर शांतपणे उभी आहे. मात्र थोड्या वेळानंतर मांजरीवर कासवाने हल्ला केला आहे. हा हल्ला होताच मांजरीने पळ काढलाय. हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर केले असून त्याला wonderfuldixe या इन्स्टाग्राम पेजवर पाहता येईल.

इतर बातम्या :

पत्नीचा अजब कारभार, स्वच्छतेच्या वेडापायी लॅपटॉप, मोबाईल धुतला; पतीने मागितला घटस्फोट

Video: पाकिस्तानच्या त्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल, तरुणीच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा!

Video: माकडांचं टोळीयुद्ध पाहिलंय, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच आपलेच पूर्वज आहेत!