अवघ्या 11 महिन्यांच्या बाळाने केलाय 23 देशांचा प्रवास, जन्माला आल्या आल्याच बनलाय टूरिस्ट!

| Updated on: Aug 29, 2023 | 4:39 PM

स्थिर आयुष्य आवडणारा माणूस कधी आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन फिरू शकतो का? 4-5 वर्षाचं बाळ असेल तर ठीक पण 6 आठवड्याचं? 11 महिन्यांचं? तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. असं धाडस जे आपण करू शकत नाही ते या जोडप्याने केलंय.

अवघ्या 11 महिन्यांच्या बाळाने केलाय 23 देशांचा प्रवास, जन्माला आल्या आल्याच बनलाय टूरिस्ट!
11 months old travelled 23 countries
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: फिरायला कुणाला आवडत नाही? सगळ्यांना फिरायला आवडतं, जगात असेही लोकं आहेत जे सगळं घरदार सोडून बाहेर पडतात आणि मनसोक्त फिरतात. तुम्हालाही म्हणलं, “चला जग फिरायला” तर तुम्ही फिरणार नाही का? जग फिरण्याइतकं सुख कशात नाही. पण सुख मिळवण्यासाठी लोकांच्या हिंमत लागते कारण सगळं मागे टाकून प्रवास करणं सोपं नसतं. हे सगळं करताना माणूस खूप विचार करतो. बहुतेक लोकांना स्थिर आयुष्य आवडतं. प्रवास करणं, फिरणं म्हणजे आयुष्य स्थिर राहत नाही. अशाच एका धाडसी जोडप्याची गोष्ट सध्या व्हायरल होतेय. हे धाडसी जोडपं सगळ्या जगात फिरलंय. आता तुम्ही म्हणाल यात काय धाडसी? तर वाचा …

बाळाला घेऊन 23 देश फिरले

हे जोडपं आहे ते जगभरात फिरलंय. या जोडप्याने आपली घर दार जमीन सगळं विकून फक्त जगभर फिरायचं ठरवलं आहे. यात अजून मोठं धाडस म्हणजे काय? त्यांचं छोटंसं बाळ आहे ते त्या बाळाला घेऊन 23 देश फिरलेत. प्रवास करणं मोठ्यांसाठीच जर अवघड होत असेल तर ते लहानांसाठी सुद्धा किती अवघड असेल विचार करा. मंडळी विशेष म्हणजे हे बाळ अवघं 6 आठवड्याचं होतं जेव्हा त्याने प्रवास केला. हे बाळ या कारणामुळे जगभर प्रसिद्ध झालंय. विचार करा 11 महिन्याचं बाळ 2-3 नाही तर 23 देश फिरलंय!

हे जोडपं एक व्हॅन घेऊन फिरतं

बेक्स लुईस आणि विल मोंटगोमरी असं या जोडप्याचं नाव आहे आणि या 11 महिन्याच्या गोंडस बाळाचं नाव एटलस आहे. बेक्स आणि लुईस ब्रिटनमध्ये राहतात. हे जोडपं स्वित्झर्लंड पासून इटली, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, सैन मैरिनो, नॉर्वे आणि डेन्मार्क इतके देश फिरलंय. प्रवासाला जाताना, जगभर फिरताना हे जोडपं एक व्हॅन घेऊन फिरतं.

एटलस अवघा 6 आठवड्यांचा असताना प्रवास

ही व्हॅन एखाद्या सेलेब्रिटीच्या व्हॅन सारखी आहे. या व्हॅन मध्ये त्यांनी एक छोटंसं घरच बनवलंय. लुईस ने सांगितलं की एटलस अवघा 6 आठवड्यांचा असताना त्याने प्रवास सुरु केला. यातला एक किस्सा सांगताना ते म्हणतात जेव्हा ते नॉर्वे मध्ये फिरत होते तेव्हा एटलसचे दात यायला सुरुवात झाली, फ्रान्स मध्ये आल्यावर एटलसला चावता येत होतं तो जेवायला लागला होता.