कोणत्याही देशात संसदेचे स्थान खूप वरचे असते. इथे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीही वादविवाद होतात. पण या दरम्यान संसदेत जे जे काही घडतं ते बरेचदा चर्चेचा ठरतो. बरेचदा ही प्रकरणे जगभरात चर्चेचा विषय बनतात. सध्या तुर्कीच्या संसदेतून अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका खासदाराने असं कृत्य केलंय जे जगात व्हायरल झालंय.
वास्तविक ही घटना तुर्कस्तानच्या विरोधी पक्षाशी संबंधित असलेल्या बुराक एरबे या खासदाराशी संबंधित आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत खासदार बोलताना दिसत आहेत आणि त्यानंतर अचानक ते खिशातून मोबाईल काढतात, मोबाईल वर ठेवतात आणि त्यावर हातोडा मारतात. अर्थातच मोबाईल फुटतो.
खासदाराने सोबत एक बॅग आणली होती आणि त्यातून त्यांनी एक छोटा हातोडाही काढला होता, असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कस्तानच्या विरोधी रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे सदस्य बुराक एरबे
हे सरकारी विधेयकाला विरोध करत होते.
Burak Erbay, a Turkish opposition lawmaker, destroyed a smartphone during his speech in parliament to protest a proposed disinformation and social media bill pic.twitter.com/robiV2iDP5
— Reuters (@Reuters) October 13, 2022
सरकारच्या म्हणण्यानुसार, हे विधेयक फेक न्यूजच्या विरोधात आणण्यात आलं आहे. पण जे या विधेयकाला विरोध करत होते त्यांचा असा आरोप आहे की हे विधेयक मंजूर झाल्यास ते वृत्तपत्र स्वातंत्र्यात बाधा आणेल आणि सरकारसाठी हे मोठे सेन्सॉरशिपचे शस्त्र बनेल.
बुराक एरबे या विधेयकाच्या विरोधात बोलत होते. त्यांनी सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, आपल्याला फक्त एकच स्वातंत्र्य उरले आहे आणि तो आपला मोबाइल आहे ज्याद्वारे आपण आपला मुद्दा ठेवू शकता आणि आता सरकार ते देखील संपवण्यासाठी तयारी करत आहे.
बुराक एरबे यांनी हा मुद्दा मांडता मांडताच बॅग मधून मोबाईल काढला तो समोर टेबलावर ठेवला आणि त्यावर जोरात हातोडा मारला. आता त्यांचा हाच व्हिडीओ जगात व्हायरल होतोय.