लोकांमध्ये अनेकदा भांडणे होतात. कधी कधी लोक छोट्या-छोट्या गोष्टींवरून सुरु होतात नंतर त्या छोट्या भांडणाचं रुपांतर मोठ्या भांडणात होतं. ‘तू-तू, मैं-मैं’ पासून सुरू झालेली भांडणे अनेकदा हाणामारी आणि लाठ्या-काठ्यांपर्यंत पोहचतात, हे तुम्ही पाहिले असेलच. अशा परिस्थितीत या मारामाऱ्याही जीवघेण्या ठरतात. सोशल मीडियावर अनेकदा अशा भांडणांशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजकाल असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात दोन मुली एकमेकांना जोरदार मारहाण करताना दिसत आहेत आणि तेही वर्गात.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर्गात दोन मोठे स्क्रीन आहेत, तर समोरच्या टेबलावर लॅपटॉप आणि पुस्तकंही ठेवलेली आहेत.
वर्गात दोन मुली एकमेकांचे केस धरून भांडताना दिसतात. त्यांच्यात बरीच हाणामारी होते. या काळात वर्गात आणखी अनेक मुले-मुली उपस्थित असतात, पण त्यांच्या भांडणात कोणालाही यायचे नसते किंवा त्यांच्या भांडणातून सुटका करून घेण्याचा प्रयत्नही होत नाही.
Kalesh B/w Girls over Who’s more Hotterpic.twitter.com/pyuSGjpRwf
— BaharKeKalesh (@Baharikekalesh) November 11, 2022
नंतर एक मुलगी बाहेरून येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते. मग त्यांचं ते भांडण कसंबसं थांबतं. त्यांची भांडणं संपणार नाहीत असं वाटत होतं.
या भांडणाचा हा व्हिडिओ @Baharikekalesh नावाच्या आयडीसह ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. कॅप्शनमध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोण जास्त हॉट आहे यावरून या दोघींमध्ये भांडण आहे.
23 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 63 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.