इंटरनेटवर मनोरंजनात्मक, विचित्र आणि मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला गेलाय. हा व्हिडीओ बंगळुरुच्या एका कॉलेजचा आहे. दोन मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा हा व्हिडीओ आहे. बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या कॅन्टीनमध्ये ही घटना घडली. तुम्हाला दिसेल या व्हिडिओमध्ये मुली बोलता बोलता अचानकच भांडू लागतात.
या दोघी आपापसात बोलत असतात, थोड्या वेळाने शाब्दिक चकमक होते. मग त्या भांडू लागतात. त्याचं रूपांतर मारामारीत होतं.
या वादादरम्यान मुली एकमेकांना चापट मारताना, धक्काबुक्की करताना दिसत आहेत. या भांडणामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Kalesh B/w Two Girls In College Canteen (DSCE, Bangalore) pic.twitter.com/E5b165yH2w
— r/Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 9, 2022
दरम्यान,हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आजूबाजूचे विद्यार्थी ओरडून जल्लोष करताना दिसतायत. भांडणाचा विषय तर माहित नाही पण यात त्या दोघीही मागे हटत नाहीयेत.
कॉलेजमध्ये अशा अनेक घटना घडत असतात. हा व्हिडीओ सुद्धा भांडण बघणाऱ्यांपैकीच कुणीतरी काढलाय. अशा घटना जेव्हा कॉलेज कॅम्पस मध्ये घडत असतात तेव्हा त्यांची मजा घेतली जाते. म्हणूनच या भांडणात इतर विद्यार्थी चिअर करतायत.