वाघाची डरकाळी ऐकायला आली की अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. वाघाच्या जवळ जायचेही माणूस कधी धाडस करत नाही. (Tiger fights) वाघाच्या तावडीत सापड्यावर वाघ फडशा पाडल्याशिवाय सोडत नाही, वाघाला सर्वात खतरनाक प्राणी मानले जाते, मात्र तरीही काही लोक वाघ पाळताना दिसून येतात. वाघांना प्रत्यक्षात बघण्याची मजाच वेगळी असते, अनेकजण वाघांना आणि इतर प्राण्यांना पाहण्यासाठी जगंल सफारीला जातात. हल्ली सोशल मीडियावरही अनेक वाघांचे व्हिडिओ व्हायरल होतात. (Forest fights)
आधी भांडण मग दोस्ती
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोन वाघ एकमेकांना भिडताना दिसून येत आहे. जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. सुरूवातील तर हे दोन वाघ एकमेकांवर तुटून पडलेले दिसतात, आता यांच्यात जबरदस्त युद्ध होणार असेच काहीसे दिसून येत आहे. मात्र काही वेळातच हे दोन्ही वाघ एकमेकांसोबत जंगलातील झाडीत निघून जातात, जसे की आत्ता काही झालेच नाही. पहिल्यांदा एकमेकांना पंजे मारणारे हे वाघ एकत्र जंगलात निघून जाताना पाहून पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. सुरूवातीला हे एकमेकांवर तुटून पडतात, मात्र काही वेळातच त्यांचा राग शांत होतो, त्यानंतर ते आरामात-एकमेकांसोबत डोलत जंगलात निघून जातात.
Fight and Friendship ??#JungleLife is full of secrets.
All fights are not territorial fights..#TigerFacts #JungleDiaries @susantananda3 @ipskabra pic.twitter.com/T50fl2Jh1D— Surender Mehra IFS (@surenmehra) December 25, 2021
जंगल लाईफचा जबरदस्त नजारा
या व्हिडिओत जंगल लाईफचा एक जबरदस्त नजारा दिसून आला आहे. असे व्हिडिओ खूप कमी पहायला मिळतात. आयएफएस अधिकारी सुरेंदर मेहरा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओला लढाई आणि दोस्ती…जंगल लाईफ रहस्यमय आहे. सर्व लढाई स्थानिक नसतात असे कॅप्शन दिले आहे. हा भन्नाट व्हिडिओ आतापर्यंत हजारो लाकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला खूप लाईक्सही आले आहेत. काही नेटकऱ्यांनी ”दोन पायांचे राक्षस सगळीकडे बसले आहेत ते त्यांना कळाले असावे” अशाही कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.