मुंबई : आजकालची मुलं गॅझेटशी अॅडिक्ट झाली आहेत. त्यांना फोन शिवाय करमत नाही. एखाद्या रडणाऱ्या मुलाला हातात फोन दिला तरी तो शांत होतो. जेवताना फोन हातात दिला तर ही मुलं पोटभर जेवण करतात. मोबाईलवर गेम खेळणं, व्हीडीओ पाहणं यात त्यांचं बालपण हरवतंय. पण अश्यात एखाद्या मुलाने बर्गरची ऑर्डर दिली तर त्याचं आश्चर्य वाटायला नको. अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका दोन वर्षीय मुलाने त्याच्या आईच्या फोनवरून चक्क 31 बर्गरची ऑर्डर दिली आहे. शिवाय डिलिव्हरी बॉयला विशेष टीपही दिली. आहे. त्याची ही टीप चर्चेत आहे. त्याने 12 शे रूपयांची टिप दिली आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
आजकाल घरातल्या चिमुकल्यांना फोनची खूप जास्त सवय झाली आहे. पण त्यामुळे काहीवेळा शारिरिक आणि आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. दोन वर्षांचा मुलाने चक्क 31 बर्गर मागवले आहेत. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ही घटना घडली आहे. एका 2 वर्षाच्या मुलाने त्याच्या आईच्या स्मार्टफोनचा वापर करून मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधून 31 चीजबर्गर ऑर्डर केलेत. शिवाय डिलिव्हरी बॉयला त्याने $16 म्हणजेच 1200 रूपयांची टीप देखील दिली. केल्सी बर्खाल्टर गोल्डन यांनी फेसबुकवर याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय की,की त्यांचा मुलगा बॅरेटने DoorDash अॅप वापरून मोठ्या प्रमाणात बर्गर ऑर्डर केले. त्यासोबत ्तयांनी या चिमुकल्याला फोटोही दिली आहे. तो त्याने ऑर्डर केलेल्या चीजबर्गरजवळ बसलेला दिसतोय.
दरम्यान याआधीही अशीच एक घटना समोर आली होती. यात अयांश कुमार या चिमुकल्याने अशीच कृती केली होती. आईचा फोन वापरून त्याने फर्निचर ऑर्डर केलं होतं. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये $2,000 (रु. 1.4 लाख) किमतीचं फर्निचर त्याने ऑनलाइन ऑर्डर केलं होतं.