मुंबई : जगात रोजच कित्येक अपघात होतात. यामध्ये काही अपघात एवढे भीषण असतात की त्यांना आपण कित्येक दिवस विसरत नाही. तर काही किस्से असेदेखील असतात ज्यामध्ये अपघातग्रस्तांची मदत करताना काही लोक त्यांच्या जीवाचं रान करतात. सध्या असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बेशुद्ध माणूस रेल्वे रुळावर पडला आहे. रुळावर पडलेल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी लोकांनी घेतलेली मेहनत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (unconscious man rescued from railway track video went viral on social media)
आपल्या आजूबाजूला जेवढे वाईट आणि कुत्सित वृत्तीचे लोक आहेत. त्याहीपेक्षा जास्त लोक अतिशय निखळ आणि चांगल्या मनाचे आहेत. याचीच प्रचिती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका रेल्वेस्थानकावर आलीय. या रेल्वेस्थानकावर एक माणसू बेशुद्ध होऊन पडला आहे. बेशुद्धावस्थेत असल्यामुळे या माणसाला कशाचेही भान नाही. समोरून एक रेल्वे येत आहे. मात्र, रुळावर पडलेल्या माणसाला काहीही समजत नाहीये. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावर उभे असलेल लोक पाहत आहेत.
हा प्रकार समजताच अमेरिकेच्या NYPD पोलिसाने मोठी हिम्मत दाखवली आहे. त्याने जीवाची पर्वा न करता बेशुद्धावस्थेत पडलेल्या माणसाला वाचवण्यासाठी रेल्वे रुळावर उडी घेतली आहे. NYPD पोलिसाने त्या माणसाला उचलून रेल्वे रुळाच्या बाजूला केलं आहे. पोलिसाचे हे प्रयत्न आणि धडपड पाहून बाजूचे नागरिकसुद्धा मदतीसाठी धावले आहेत. त्यांनी पोलिसाला मदत करत बेशुद्ध झालेल्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.
पाहा व्हिडीओ :
या सर्व घटनेचा व्हिडिओ अमेरिकेतील NYPD पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून पोलिसाचे कौतूक करत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सर्व समाजमाध्यमांवर व्हायरल झालाय.
इतर बातम्या :
Video | नवशिख्या चोराला धाडस नडलं, हेल्मेट चोरायला गेला अन् जाळ्यात फसला, व्हिडिओ व्हायरल
Video | कुत्र्यांवर महिलेचं भलतंच प्रेम, पण खेळताना मध्येच घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?
Video | भर चौकात जोडीची करामत, तरुण-तरुणीचा मजेदार डान्स व्हायरल
(unconscious man rescued from railway track video went viral on social media)