सावधान… Ghibli फोटो तयार करणं सेफ आहे की नाही? जाणून घ्या दुष्परिणाम

| Updated on: Mar 31, 2025 | 12:37 PM

Ghibli Art: Ghibli फोटो ट्रेंड की एक भयानक जाळं? ChatGPT च्या Ghibli आर्ट जनरेटरवर फोटो अपलोड करणं सेफ आहे की नाही? जाणून घ्या दुष्परिणाम... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त Ghibli फोटोंचं वेड सर्वांना लागलं आहे.

सावधान... Ghibli फोटो तयार करणं सेफ आहे  की नाही? जाणून घ्या दुष्परिणाम
Follow us on

Ghibli Art: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त Ghibli फोटोंची चर्चा रंगली आहे. असंख्य लोकांनी Ghibli ट्रेंड फॉलो करत स्वतःचे AI फोटो तयार केले आहेत. पण लोकांनी डिजिटल गोपनीयतेच्या संदर्भात OpenAI च्या Ghibli AI आर्ट जनरेटरबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही चॅटजीपीटीमध्ये तुमचे वैयक्तिक फोटो अपलोड करून Ghibli Art तयार करत असाल तर ते किती सुरक्षित आहे ते आधी जाणून घ्या. Ghibli Art खरंच सेफ आहे की नाही? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.

सांगायचं झालं तर, Ghibli Art हा ट्रेंड व्हायरल झाला आहे, परंतु समीक्षकांनी यांवर चिंता व्यक्त केली आहे. वापरकर्ते नकळतपणे OpenAI ला वेगवेगल्या चेहऱ्यांचा डेटा प्रदान करत आहेत, ज्यामुळे त्यांची गोपनीयता धोक्यात येऊ शकते.

 

 

वापरकर्त्यांना कोणते धोके आहेत?

एका युजरने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांनी चेतावनी दिली आहे. वापरकर्त्यांनी एकदा त्यांचे फोटो सबमिट केले की ते त्या फोटोंच्या वापरावरील नियंत्रण गमावतात. तर OpenAI चे गोपनीयता धोरण असं सांगतं की वापरकर्ता इनपुट मॉडेल प्रशिक्षणासाठी वापरलं जाऊ शकतं. हे भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे… असं देखील पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

1. गोपनीयतेचं उल्लंघन – फोटो अपलोड केल्यानंतर त्यावर तुमचा अधिकार राहत नाही. म्हणून तुमचा फोटो अन्य कामांसाठी देखील वापरला जावू शकतो.

2. ओळख चोरी: तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंचा गैरवापर करून एखाद्याची ओळख चोरली जाऊ शकते.

3. सुरक्षित डेटा : यामुळे तुमची खासगी माहिती सुरक्षित राहू शकत नाही आणि तुम्ही हॅकिंगचे बळी होऊ शकतात.

4. चुकीचा वापर : तुमच्या फोटोंचा चुकीच्या कामासाठी उपयोग केला जाऊ शकतो. जसं की, खोटे प्रोफाईल बनवणे, इत्यादी…

5. कायदेशीर मुद्दे : वापरकर्त्यांच्या फोटोंचा अनधिकृत वापर कायदेशीर समस्या निर्माण करू शकतो. हे धोके लक्षात घेऊन, वापरकर्त्यांनी त्यांचे फोटो शेअर करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे.