3 कोटी 66 लाख 90 हजार रुपये, या बड्या कलाकाराने ड्रेसची ठेवली किंमत, युजर म्हणाले EMI वर मिळणार का?

| Updated on: Dec 02, 2024 | 10:07 AM

Urfi Javed: उर्फी जावेद हिने नुकतीच 'फॉलो कर लो यार' नावाची वेब सीरिज काढली आहे. या वेब सीरीजमध्ये तिचे कुटुंब, संघर्ष आणि ती कशी प्रसिद्ध आल्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. प्राइम व्हिडियोवर ही वेब सीरीज दिसणार आहे.

3 कोटी 66 लाख 90 हजार रुपये, या बड्या कलाकाराने ड्रेसची ठेवली किंमत, युजर म्हणाले EMI वर मिळणार का?
urfi javed
Follow us on

Urfi Javed: फॅशन आयकॉन उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. तिच्या ड्रेसमुळे काही लोकांना तिची क्रिएटिव्हिटी आवडते तर काही लोक तिला ट्रोल करतात. मात्र आता उर्फी जावेद हिने वेगळा निर्णय घेतला आहे. तिने तिचा खास ड्रेस विकण्यासाठी काढला आहे. त्या ड्रेसची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. 3 कोटी 66 लाख 90 हजार रुपये तिच्या एका ड्रेसची किंमत आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या तिच्या या पोस्टवर वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे त्या पोस्टमध्ये?

उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रीय असते. ती वेगवेगळ्या कपड्यांमधील तिच्या पोज टाकत असते. यावेळी तिने तिचा ड्रेस विकण्यासाठी काढला आहे. तिने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तिने तिचा ड्रेस विकायचा असल्याचे म्हटले आहे. तिने तिच्या ड्रेसची किंमत कॅप्शनमध्ये अक्षरी आणि अंकात दिली आहे. 3 कोटी 66 लाख 90 हजार रुपयांचा हा ड्रेस आहे. ज्यांना हा ड्रेस खरेदी करायचा आहे, त्यांनी मला संपर्क करावा, असे तिने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया

3.5 कोटी रुपयांची ड्रेस पाहून नेटकरी प्रतिक्रिया देऊ लागले आहे. उर्फी जावेदच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘मला हा ड्रेस ईएमआयवर मिळेल का? तर एकाने लिहिले की दर थोडा कमी आहे नाहीतर मी ते विकत घेतला असता. आणखी एकाने लिहिले आहे, माझ्याकडे 50 रुपये कमी आहेत नाहीतर मी नक्कीच विकत घेतला असता.

उर्फी जावेद हिने नुकतीच ‘फॉलो कर लो यार’ नावाची वेब सीरिज काढली आहे. या वेब सीरीजमध्ये तिचे कुटुंब, संघर्ष आणि ती कशी प्रसिद्ध आल्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. प्राइम व्हिडियोवर ही वेब सीरीज दिसणार आहे.